अर्धापुरातील एटीएमचे 3 लाख 50 हजार रुपये पळविणा-या 2 चोरट्यांना पोलीसांनी केली अटक
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.2.जिल्यातील अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकाजवळील वानखेडे कॉम्प्लेक्स येथील इंडिया 1 या कंपनीचे एटीएम आहे. या एटीएमवरील चोरट्यांनी भरदिवसा एटीएम मशीनमध्ये टाकण्यासाठी असलेली रक्कम 3 लाख 50 हजार रुपयांची बॅग बंदूकीच्या धाक दाखवत हिसकावुन घेऊन मोटारसायकलवर पळून गेले होते. या चोरी प्रकरणी 2 जणांना अर्धापूर पोलीसांनी अटक केली आहे.
अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर बसवेश्वर चौकाच्या बाजुला वानखेडे कॉम्प्लेक्स येथे इंडिया 1 खाजगी कंपनीचे एटीएम आहे.या एटीएमवर सुरक्षेची कुठलीच यंत्रणा नसल्याने दि.8 नोव्हेंबर रोजी भरदिवसा दुपारी 2:30 च्या सुमारास एटीएम मशीन मध्ये कर्मचारी रक्कम टाकण्यासाठी बॅग घेऊन आला असता अज्ञात दोन चोरट्यांनी एटीएमम समोर मोटार सायकल गाडी थांबविली त्यातील एक जण एटीएम जवळ आला व पैसे टाकणाऱ्या कर्मचारी यास छऱ्याच्या बंदुकीच्या गोळ्या मारून दहशत दाखवत हातातील बॅग घेऊन पळ काढला.यामध्ये 3 लाख 50 हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली होती.या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून चोरट्यांचा शोध गोपनीय पध्दतीने तपास करून पोलिस निरीक्षक अशोक जाधव, पोलीस नाईक राजेश घुन्नर, गुरूदास आरेवार, यांनी चोरी प्रकरणी आरोपी अय्याज अहमद म.मफूर रा.वसमत,शहबाज जमिल अहमद अन्सारी रा.गौसी लोटा, उत्तर प्रदेश या आरोपींनी एटीएम मध्ये पैसे टाकताना बॅग चोरून नेऊन 3 लाख 50 हजार रुपये पळविले होते.या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे