धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांचा अनोखा उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.शहरात गेल्या २७ महिन्यापासून धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या कायापालट या उपक्रमात आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून स्वच्छ पाण्याने अंघोळ घातल्यानंतर नवीन कपडे व शंभर रुपयाची बक्षिसी देण्याचा अनोखा उपक्रम म्हणजे म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा माहेश्वरी सभेचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.चिरंजीलाल दागडिया यांनी केले.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम गेल्या २७ महिन्यापासून अखंडित सुरू आहे.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी,रीजनल चेअरपर्सन योगेश जयस्वाल मार्गदर्शक यांच्या अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा,महेश शिंदे,संजयकुमार गायकवाड यांनी शहरातील विविध भागातून स्वतःच्या दुचाकी वर भ्रमिष्ट,कचरा वेचणारे,अपंग, बेघर नागरिकांना बसून आणले. स्वयंसेवक बालाजी खोडके यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने स्वच्छ पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना निलेश पै आणि रामशरण चौधरी यांनी साबण लावून स्नान घातले. त्यानंतर अंडरपॅन्ट,बनियन व पॅन्ट शर्ट मिळाल्यामुळे सर्वजण खुश झाले. ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात येते.पूर्वीचे मळके कपडे,अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःला नवल वाटले.हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.छाया: संजयकुमार गायकवाड