कोठारी येथिल पुलासंदर्भात प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला नाही- संदीप केंद्रे
किनवट ता. प्र दि ३ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या कोठारी येथिल पुलासंदर्भात भाजपाचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी पलटवार केला असुन किनवट तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे १५ वर्ष आमदार होते ते ते स्वतः जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी तो पुल उभारला नाही तर आता हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला नाही असे हि त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राज्यात अस्थिर सरकार व निष्क्रीय राज्यकर्त्यांमुळे नागरीकांचे नुकसान होत असुन कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने लादण्यात आलेले लॉकडाऊन व राज्य सरकार कडुन विकास कामांकरिता रोखण्यात आलेल्या निधी मुळे सदर पुल रखडला असुन मुळात आ. भिमराव केराम हे निवडुन आल्या नंतर त्यांनी मौजे कोठारी येथिल पुलाची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे, इस्टिमेट तयार करण्यात आले आहे तर टेंडर हि लवकरच लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे या पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे तर आ. भिमराव केरांम यांनी या पुलाची रुंदी वाढवुन घेतली असुन यापुर्वी ४.५ मिटर रुंदीचा पुल हा ६.५ असा रुंद करुन मंजुर करवुन घेतला आहे त्यामुळे त्याच्या संपुर्ण प्रक्रीयेला पुन्हा राबविण्यात आल्याने त्याच्या मंजुरीत व प्रक्रीयेत विलंब झाला तरी लवकरच या पुलाचे भुमिपुजन केले जाणार आहे. त्यामुळे नैतिकता नसलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांनी या बाबत प्रश्न विचारु नये उलट त्यांनी मागील १५ वर्ष काय केले या प्रश्नाचे उत्तर द्यावे. असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संदिप केंद्रे यांनी केला आहे.