किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

करखेली ग्रामपंचायत कार्यालयाच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन ग्राम सेविकेच्या पतीस व सरपंचांना अटक! तब्बल 13 लाखाचा अपहार प्रकरणी ;ग्रामसेविकेने मंजूर करून घेतला अटकपूर्व जामीन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.26.जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील मौजे करखेली ग्रामपंचायत कार्यालयात तब्बल 13 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्राम सेविकेच्या पतीस व सरपंच बाईस अटक करण्यात धर्माबाद पोलिसांना यश मिळाले असून या प्रकरणात ग्राम सेविकेने उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवून घेऊन न्यायालयाच्या आदेशाने जवळपास सहा लक्ष रुपये रिकव्हरी भरली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

धर्माबाद तालुक्यातील करखेली ही ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कार्याने चर्चेचा विषय बनलेली असते. या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका रुक्मिणी दत्तू खोडेवार सरपंच मीरा गोपीनाथ सोनटक्के व ग्रामसेविकेचा पती काशिनाथ विश्वनाथ पट्टेवाड यांनी 14 व्या वित्त आयोगाच्या आराखड्याप्रमाणे कामे न करता संगणमत करून शासनाच्या तब्बल 13 लक्ष 37 हजार 848 रुपयाचा अपहार केल्याची तक्रार नायगाव येथील आरटीआय कार्यकर्ते प्रभाकर तुळशीराम लखपत्रेवार यांनी केली होती. त्यानुसार गु.र.न.90/ 2021 कलम 420, 406,409,465, 468, 467, 471,474,166 अ 120 ब प्रमाणे धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कराड यांनी तपास केला.त्यांची मधेच बदली झाल्यामुळे नव्यानेच रुजू झालेले पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार पंतोजी यांनी या प्रकरणात तपासाची चक्रे जोरदार फिरवली.

त्यांच्या तपासाच्या चक्राला घाबरून जाऊन ग्रामसेविका रुक्मिणी खोडेवार यांनी माननीय उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला व अपहार प्रकरणी दंडात्मक कारवाई म्हणून जवळपास सहा लक्ष रुपयांचा भरणा त्यांनी शासनदरबारी केला.या प्रकरणात सरपंच सौ मीरा गोपीनाथ सोनटक्के यांना दिनांक 18 जानेवारी रोजी धर्माबाद पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्या गेली.तद्वतच ग्राम सेविकेचे पती काशिनाथ विश्वनाथ पट्टेवार यांनाही दिनांक 24 जानेवारी रोजी धर्माबाद पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे सादर केले.
सदरील प्रकरणात तब्बल 13 लाख 37 हजार 848 रुपयांचा अपहार झाला असून यासंदर्भात गुन्हा झाल्यानंतर हा गुन्हा खारीज करावा यासाठी ग्रामसेविका खोडेवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

पण त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली.त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवला असला तरी या प्रकरणात सदरील ग्रामसेवकेस व त्यांच्या पत्नीस सजा होणारच असे जाणकार वकिलाचे मत असून सरपंच मीरा गोपिनाथ सोनटक्के यांनी न्यायालयाला शपथपत्र लिहून देताना या गैरव्यवहारात मला अंधारात ठेवण्यात आले असून हे सर्व गौडबंगाल ग्रामसेविका आर.डी. खोडेवार यांचेच असल्याचे त्यांनी साश्रू नयनांनी सांगितले.

सदरील प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कराड यांच्यानंतर अगदी निष्पक्षपणे नव्यानेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक पंतोजी विजयकुमार हे करीत असून त्यांच्या ह्या तपासाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा प्रकारचे ग्रामपंचायत कार्यालयात अपहार करणार्‍या ग्रामसेवकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

759 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.