स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीत जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीचा खून ; मनूर ता.उमरी येथे घडलेली घटना
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:स्वस्त धान्य दुकानाची तक्रार गावातील शेकडो लोकांनी दिल्यानंतर त्याबाबत चौकशीत आपले म्हणणे सांगण्यासाठी जाणाऱ्या एका ६५ – ७० वर्षीय व्यक्तीचा स्वस्त धान्य दुकानदार आणि त्यांच्या नातलगांनी मिळून खून केल्याचा प्रकार मनूर ता.उमरी येथे आज बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मनुर ता.उमरी येथे मनुरकर कुटुंबियांचे स्वस्त धान्य दुकान आहे.
गावातील शेकडो लोकांनी या स्वस्त धान्य दुकानबाबत तक्रार दिली की,आम्हाला या दुकानातून धान्य नको आहे,तेव्हा आम्हाला दुकान बदलून द्यावे.आज याबाबत चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तलाठी हे मनूर गावात आले होते.चौकशी सुरु होती.त्यात आले काय सांगणे आहे हे मांडण्यासाठी मनूर गावातील धोंडिबा शंकर पोलावार हे जात असतांना स्वस्त धान्य दुकानदार आणि त्याचे नातलग यांनी धोंडिबाना शिवीगाळ करून मारहाण केली.त्यातच धोंडिबाचा मृत्यू झाला.
या संदर्भाने उमरी पोलिसानी गुन्हा क्रमांक ४/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ सह अनेक कलमानुसार दाखल केला आहे.पोलीस प्राथमिकी मध्ये शिवाजी मनुरकर,राजेश मनुरकर,चक्रधर मनुरकर,गणेश मनुरकर,गोविंद मनुरकर अशी पाच जणांची नावे असल्याची खात्रीलायक माहिती आहे.या खून प्रकरणाचा तपास पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मोहन भोसले हे करीत आहेत