पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावे;गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई/प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील सध्या स्थितीतील कोविड 19 या साथरोगाच्या अनुषंगाने अनेक पत्रकारांकडून पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत निवेदन प्राप्त होत आहेत.
भारतातील इतर काही राज्यात पत्रकारांना त्या त्या राज्यात ने फ्रन्टलाइन पत्रकार म्हणून घोषित केले असल्याचे समजते त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा विविध स्तरातून अनेक पत्रकारांकडून फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करण्याबाबत मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा असे माझ्या विभागाचेही मत आहे.
तरी महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील covid-19 या रोगाच्या अनुषंगाने पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करणेबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावे अशी विनंती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
यापूर्वी माननीय ना. छगन भुजबळ , ना. बाळासाहेब थोरात तसेच बऱ्याच मंत्र्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.
आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याकडे सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांचे लक्ष लागून आहे.