शनिवार पेठ येथिल ग्रामपंचायत चा अंधळा कारभार -मारोती देवकाते (प्रहार)
किनवट तालुका प्रतिनिधी
किनवट तालुक्यातील शनिवारपेठ गावातील नालिचे पाणी अक्षरशा रोड ने वाहत आहे, तर त्या कडे गावातील ग्राम सेवक व सरपंच काना डोळा करत आहे अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचा ता. युवा सचिव यांनी केली आहे.
सध्या सगळीकडे कोरोना सारखी महामारी बिमारी पसरीलेली आहे त्यात सरकार वेगवेगळ्या माध्यमातुन उपाययोजना करत आहे.
आणि वांरवार स्वच्छ राहण्यासाठी सांगत आहे. त्यात असे नालीचे घान पाणी रोडने वाहत असल्यामुळे गावातील नागरीकांच्या आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
आज सर्व प्रशासन आपला जिव धोक्यात घालुन जनतेसाठी उपाययोजना करण्यासाठी तत्पर उभे आहेत आणि त्यात ग्रामीण भागात आरोग्य यंत्रेणे कडे ना स्थानिक प्रशासनाचे किंवा लोकप्रतिनिधी चे जरा देखिल लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
हे असेच चालत राहीले तर अम्ही सर्व ग्राम वासियाना जिवनातुन उठावे लागेल अशी तक्रार जनतेतुन केली जात आहे,
ह्या अगोदर प्रहार चे युवा सचिव यांनी ग्रामसेवक तथा सरपंच यांना समक्ष भेटुन या संदर्भात बोलन केल असता त्यांना अध्यापही जाग अलेली दिसुन येत नाही,
याकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी ने बारकाईने लक्ष घालावे अशी विनंती.