बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथील करीअर कट्टा विभागाच्या वतीने आयोजित, आय. ए. एस. आपल्या भेटीला कार्यक्रम संपन्न.
किनवट/प्रतिनिधी: बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथील करीअर कट्टा विभागाच्या वतीने आयोजित, आय. ए. एस. आपल्या भेटीला कार्यक्रम संपन्न.कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर होते,
सुरवातीला थोर समाज सुधारक बळीराम पाटील यांच्या अर्धपुतळ्याची उपस्थितत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी मा. मेघना कावली उपविभागीय अधिकारी यांचे स्वागत बुके देवून प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर यांनी केले, तसेच याप्रसंगी मंचावर नायब तहसीलदार रामेश्वर मुंडे, एन. एम. त्रिभुवन, सहाययक नितीन शिंदे, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे व डॉ. शुभांगी दिवे मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद भालेराव समन्वयक करीअर कट्टा यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक आय. ए. एस. मेघना कावली मॅडम यांनी विध्यार्थी, विध्यार्थीनीना मार्गदर्शन केले, त्यांनी स्वतःच्या शिक्षण, नौकरी, व आय. ए. एस. कसे झाले त्याबद्दल व mpsc, उपासक, सेंट्रल सर्विसेस, 30 IAS कॅडर सर्विस, बँकिंग, रेल्वे, इन्शुरन्स व प्रशासकीय सेवा संदर्भात विषतृत माहिती दिली. प्रॉब्लेम समजा, ठरवा व सोडवा, आई -वडील व गुरुजणांचे मार्गदर्शन घ्या, ऑनलाईन व ऑफलाईन रिसॉर्श, टेस्ट सिरीयज चा वापर करून, जिद्द, चिकाटी व मेहनत करून जीवनात यशषवी व्हावे असे मार्गदर्शन केले, त्यानंतर विध्यार्थी, विध्यार्थीनी नी प्रश्न विचारले त्यावर मार्गदर्शनपर उत्तरे व शंकाचे निराकरन मॅडम ने केले,यावेळी प्रा. संतोष पवार, तनिष्का पिल्लेवार, दिशा बरडे, तेजशवी गायकवाड यांचा मॅडम च्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार प्रा. शेषराव माने रासेयो अधिकारी यांनी मानले, कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी करीअर संसद मुख्यमंत्री अनुसया पवार व करीअर कट्टा सहभागी विध्यार्थी तसेच करीअर संसद पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.