थंडीत कुडकुडणाऱ्या बेघरांच्या अंगावर २०२२ ब्लॅंकेट पांघरून दिली मायेची ऊब : ऍड.दिलीप ठाकूर यांचा अभिनव उपक्रम यशस्वी
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.19.शहरात रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या बेघरांच्या अंगावर २०२२ ब्लॅंकेट पांघरून मायेची ऊब देणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा दुसऱ्या वर्षीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते शनिवारी रात्री नगीनाघाट परिसरातून करण्यात आला.
भाजप महानगर नांदेड आणि लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने हा उपक्रम एक जानेवारी पासून सुरू करण्यात येणार होता. परंतु थंडी वाढल्यामुळे पंधरा दिवस आधीच ब्लँकेट वाटपाची सुरुवात करण्यात आली. लंगर साहेब गुरुद्वाराचे बाबा सुभेकसिंघ आणि लायन्स पूर्व प्रांतपाल ॲड.प्रवीण अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स प्रांत सचिव डॉ.विजय भारतीया हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रांत उपसचिव संजय अग्रवाल,झोनल सेक्रेटरी दीपक रंगनानी,लायन्स मेन क्लब अध्यक्ष शिवप्रसाद टाक, लायन्स प्रोफेशनल अध्यक्ष योगेश पाटील, अमोल चक्रवार,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा संयोजक प्रशांत पळसकर, शेखर भावसार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमासाठी ब्लॅंकेट दिलेले ॲड. बी.एच. निरणे, मारुती कदम, सचिन पाठक यांचा शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, २०२२ ब्लॅंकेट पैकी १०५० ब्लॅंकेट ची नोंदणी झाली आहे. दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यावर फिरून ब्लँकेट वाटप करण्यात येणार असल्यामुळे दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
पहिल्या दिवशी नगिनाघाट परिसर व विष्णुपुरी शासकीय रुग्णालय या ठिकाणी दिलीप ठाकूर,अरुणकुमार काबरा,सुरेश निलावार,कामाजी सरोदे, सविता काबरा, बालाजी मंदिर चे कैलास महाराज वैष्णव,राजेशसिंह ठाकूर, नथूलाल यादव, राजेश यादव यांनी चारशे ब्लँकेटचे वितरण केले.या उपक्रमासाठी चंद्रकांत गंजेवार,शिवराज पाटील गोळेगावकर, शरत नरसिमुलु महाजन सिंगापूर,गुलाम अली भारवाणी अमेरिका,दिलीप ठाकूर,प्रदीप भेलोंडे,प्रमोद हिबारे,स्नेहलता जयस्वाल हैदराबाद,विश्वजीत मारुती कदम,वेदांत मुकुंद धर्मापुरीकर , गोविंद गंगाधरराव बिडवई कंधारकर,आनंद ट्रेडर्स मरवाळीकर नायगाव,प्रफुल कांडलकर हडको,कु.शिवानी रघुनाथसिंह चौहाण
मजगे परिवार लातूर,डॉ.गोपाल राठी,डॉ.यशवंत चव्हाण
सतीश सुगनचंदजी शर्मा,जयश्री झाडे लातूर,व्यंकटेश कवटेकवार, उपप्राचार्य प्रभाकर उदगिरे,भाऊसाहेब देशमुख,सिद्राम सूर्यभान दाडगे,मोहित जयप्रकाश सोनी,आर्यन आनंद जायस्वाल सिडको,वसंत अहिरे,प्रा.रमेशचंद्र एन.जयस्वाल चोपडा,खिराप्पा नारायण अकमार शिरड शहापुर,भास्कर दिगंबरराव चव्हाण,राजेश्वर लापशेटवार, एसकेबी,रंगनाथ माणिकराव विष्णुपुरीकर,पांडुरंग जोशी बा-हाळी,अशोक गंजेवार,उमा गट्टाणी,गोपाळराव पाठक,शंकर तगडपल्लेवार,दीपक झरकर यांचे सहकार्य लाभले आहे.कमीत कमी वीस ब्लॅंकेट देणाऱ्या दात्यांचे नाव रबर प्रिंट द्वारे ब्लॅंकेट वर टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.