नायगाव तालुक्यातील मौ.खैरगावचे ग्रा.वादग्रस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवक अशोक कदम यांना तात्काळ निलंबित करा विशाल घंटेवाड यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
नांदेड (सूर्यकांत तादलापुरकर): नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यांमध्ये मौ खैरगाव ग्रामपंचायतचे वादग्रस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवक अशोक कदम यांच्यावर तात्काळ निलंबित करून कडक कारवाई करून भ्रष्टाचाराची रक्कम शासन दरबारी जमा करा असे लेखी तक्रार मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की नायगाव तालुक्यातील मौ खैरगाव ग्रामपंचायत मध्ये वादग्रस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवक अशोक कदम यांनी जेव्हापासून या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून ते आज पर्यंत भ्रष्टाचाराचा कळसच गाठला आहे सदर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून येथील नागरिकांना मूलभूत सुख-सुविधा मिळण्यात यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजने अंतर्गत लाखो रुपये या ग्रामपंचायत ला दिले गेले पण सदर वादग्रस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवक अशोक कदम यांनी स्थानिक नागरिकांना मूलभूत योजनेचा लाभ न देता या सर्व योजनेची रक्कम सरपंचा सोबत हातमिलनाने हि पूर्ण रक्कम हडप केली आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे यामध्ये चौदावा वित्त आयोग,दलित वस्ती सुधार योजना,स्वच्छ भारत शौचालय योजना, रमाई आवास योजना या सर्वा मध्ये सदरील वादग्रस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवक अशोक कदम यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आर्थिक घोटाळा केले आहे या सर्व घोटाळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी नांदेड व मुख्याधिकारी जिल्हापरिषद नांदेड यांच्या कडे जाऊन तक्रारी निवेदन दिले आहे कि वरील वादग्रस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवकास तात्काळ निलंबन करून कडक कारवाई करावे अन्यथा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.07/12/2021 रोजी पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा विशाल घंटेवाड यांच्या वतीने देण्यात आले आहे आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की वरील वादग्रस्त भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर जिल्हास्तरावरून काय कारवाई केली जाईल हे पाहणे महत्वाचे आहे असे समस्त खैरगाव ग्रामपंचायत च्या गावकरी मंडळीचे म्हणणे आहे.