किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बोधडी बु. ते येंदा-पेंदा जाणार्‍या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांना करावी लागतंय तारेवरची कसरत

किनवट/प्रतिनिधी— बोधडी बु. ते येंदा-पेंदा जाणार्‍या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. किनवट स्थित जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे अधूनमधून दुरुस्तीवर केलेला खर्च कुचकामी ठरत आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून खड्यांमुळेच झालेल्या अपघाताची जिम्मेदारी शाखा अभियंत्यावर सोपवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
बोधडी बु. ते येंदा-पेंदा हा जवळपास बारा कि.मि. लांबीचा एकमेव मार्ग आहे. किनवट येथिल जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यकक्षेतील हा रस्ता अाहे. उपअभियंता दांडीबहाद्दर असून स्थानिकच्या एकाच शाखा अभियंत्यावर वर्षानवर्षापासून बिस्त आहे. हा अभियंता भ्रष्टाचारी असल्यामुळे रस्ते विकासाची वाट लावली आहे. कामकरणार्‍या एजन्सीज आणि अभियंत्यांच्या मनमर्जीतून थुकपाॅलीसीचे काम करुन विकास निधीवर सरळसरळ डल्ला मारत असल्याने रस्त्ते खड्डेमय झाल्याचा आरोप करण्यात येतो. बोधडी बु.लगतच्या नाल्यावरील पुलाची वर्षातून तीन वेळा दुरुस्ता करुनही दयनीय अवस्थेबद्धल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संबंधाने प्रशासनाची बाजु समजून घेण्यासाठी संपर्क केला मात्र जबाबदार हे दांडीबहाद्दर असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
या मार्गावर अनेकदा अपघातं झालीत पण लोकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचु दिल्या जात नाही. ना या रस्त्याविषयी उघडपणे हिंमत करुन पुढे येऊन बोलायला धजावत नाहीत. परिणामी निमुटपणे सहन करुन बसणे यापेक्षा वेगळा कांहीही नसल्याचे धक्कादायक ऐकायला मिळाले. बोधडी खुर्द, भुलजा, पार्डी खुर्द, कोपरा, पेंदा, नागसवाडी, येंदा आणि विदर्भातील गाडी, बोरी, थेरडीसह अन्य गावांचा बोधडी बु. मार्केटसाठी संपर्क करणारा हाच प्रमूख मार्ग आहे. प्रचंड वर्दळ असते. रेती तस्करीच्या वाहनांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. अपघात आणि अपघातातून प्रवाशांना झालेली ईजा तसेच आलेले अपंगत्वाला अभियंत्यालाच जिम्मेदार धरुन त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.

389 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.