लोणी(खु)हल्ला प्रकरणी नांदेड भारतीय लहुजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
नांदेड/प्रतिनिधी: भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दि२०/११/२०२१ रोजी रात्री ८ च्या दरम्यान मौजे लोणी ( खुर्द) ता. रिसोड जि. वाशीम येथे जातीयवादी गावगुंडानी महाक्रांतीवीर देशपिता लहुजी साळवे यांचा फोटो लावण्याच्या कारणावरून विज पुरवठा खंडीत करून मातंग समाजाच्या युवकांवर ,वृद्ध, लहान मुलासह महिलांना देखील कुर्हाड, तलवार, दगड , लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणारे जातीयवादी गावगुंडावर योग्य ती कडक कार्यवाही करण्यात यावी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व त्या कुंटुबाचे पुनवर्सन करून पिडीत कुंटुबाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी.या भ्याड हल्ल्याचा तिव्र जाहीर निषेध करून सदरील घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन दि.२३/११/२०२१ रोजी जिल्हधिकारी यांना देण्यात आले याप्रसंगी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीतदादा बारहाळीकर, मराठवाडा कायदेविषयक सल्लागार अॅड लक्ष्मीकांत दुधकवडे, नांदेड जिल्हा अध्यक्ष गोपाळ वाघमारे, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख के.एम. दाहिकांबळे उपस्थीत होते.