हज्जापुर ग्रामपंचायतीचा निधी खाजगी व्यक्तींच्या नावे उचलल्याप्रकरणी ग्रामसेवक तानाजी हांडे निलंबित
*ग्रामपंचायतीचे विविध कामावरील देयके संबंधित दुकानदार,मजुर एजन्सी यांच्या नावे न देता त्रीयस्त व्यक्तीच्या नावे उचल करुन किर्दीस खर्च नोंदवुन लेखा संहिता २०११ चे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबन*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.13.जिल्यातील बिलोली तालुक्या मधील हज्जापुर ग्रामपंचायतीअंतर्गत १४ व्या वित्त आयोगासह विविध योजनेतुन करण्यात आलेल्या कामाचे देयके संबंधित दुकानदार, मजुर एजन्सी यांच्या नावे न देता ञयस्त व्यक्तीच्या नावे उचलल्याप्रकरणी ग्रामसेवक तानाजी हांडे यांना जिल्हा परीषद सेवेतुन निलंबित करण्याचे करण्याचे आदेश जिल्हापरीषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी दिले आहे.
बिलोली तालुक्यातील हज्जापुर ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोग,कर वसुल,शौचालय बांधकाम,नवबौध्द घटकाचा विकास करणे,अंतर्गत सी.सी.रस्ते इत्यादी कामात आर्थिक अनियमितता आढळुन आल्याने चौकशी करण्यात आले माञ त्यात कसलेही तथ्य आढळुन आले नाही.
परंतु ग्रामपंचायतीचे विविध कामावरील देयके संबंधित दुकानदार,मजुर एजन्सी यांच्या नावे न देता ञयस्त व्यक्तीच्या नावे उचल करुन किर्दीस खर्च नोंदवुन लेखा संहिता २०११ चे उल्लंघन केल्याप्रकरणी हज्जापुर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तानाजी हांडे यांना जिल्हा परीषद सेवेतुन निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यकार्यकारी नामदेव केंद्रे यांनी दिले आहे.
यासह निलंबन काळात संबंधित ग्रामसेवक हांडे यांनी पंचायत समिती नायगांव कार्यालयात रुजु व्हावे व पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही निलंबन आदेशात नमुद करण्यात आले आहे.
सदर निलंबनाने बिलोली पंचायत समिती कार्यालयात एकच चर्चा सुरु झाली माञ राजकीय वलय असलेल्या ग्रामसेवक हांडे यांचे निलंबन कायम राहणार की? रद्द होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.माझ्याकामात व आर्थिक देयकात अजिबात अनियमितता झाली नसुन सदर निलंबन हे खोटे असल्याचे ग्रामसेवक तानाजी हांडे यांनी सांगितले.
सध्यस्थितीत जिल्हापरीषद विभागाने ग्रामपंचायत स्तरावरील केलेल्या कामाचा निधीचे देयके हे पिएफएम प्रणालीद्वारे थेट संबंधितांना अदा करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.त्यामुळे बरेच ग्रामसेवक गोंधळुन जात आहेत