आमचे दैवत कै.नामदेवरावजी (दादा) केरबाजीरावजी तादलापुरकर यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
नांदेड: नामदेवरावजी (दादा) तादलापुरकर यांचा तादलापूर या गावी यांचा जन्म झाले वडिलांचे नाव :केरबाजीरावजी तादलापुरकर त्यांच्या आईचे नाव:तुळसाबाई तादलापुरकर नामदेवरावजी दादा तादलापुरकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची, हाल्याक्याची होती त्यांचे आई-वडील मोलमजुरी करायचे नामदेवरावजी दादा यांना एकूण पाच भाऊ होते व दोन बहिणी होते त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून सहा भाऊंनी खूप अभ्यास केला व सहाही भाऊ एका मताने राहत होते व सहा भाऊंनी मनात एकच धैर्य ठेवला माझे आई-वडील आमच्या सर्वांसाठी खूप कष्ट करतात हे कष्ट व्यर्थ जाऊ नये म्हणून मी खूप अभ्यास करणार व एक दिवशी माझ्या आई वडिलांचे नाव उच्च करणार मग याच मार्गाने चालत ते मोठे झाले व नामदेवरावजी दादा यांनी यशाची पायरी चढली व त्यांनी प्रथम सिंचन भवन मध्ये शासकीय सेवेत रुजू झाले व त्यांच्या पाठोपाठ चार हि भाऊ शासकीय सेवेत रुजू होउन गोरगरीब जनतेची सेवा केली व एक भाऊ व्यवसाय करीत होते नक्कीच यांच्या जिद्दीला माझा मानाचा मुजरा या रत्नांचा जर का आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीने एकच ध्यास शिक्षणाची कास होईल मी शासकीय सेवेत पास असेच ध्येय निश्चित केल्यास नक्कीच आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करण्यास वेळ लागणार नाही म्हणून अशा महान संघर्षमय जीवनातून पास होऊन सुखी जीवनाकडे वाटचाल करीत असताना काळाने आमच्यावर घाव घातला आणि दिनांक 24 नोव्हेंबर 2004 रोजी आमच्या दैवताचे दुःखद निधन झाले या निधनामुळे आम्ही सर्वजण पोरके झालो आज सुद्धा अतिशय जड अंतकरणाने आम्हाला विनम्र अभिवादन कराव लागतो म्हणूनच असे आमचे महान दैवत कै. नामदेवरावजी यांच्या 17 व्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या चरणी नतमस्तक करून विनम्र अभिवादन करतोत.अभिवादनकर्ते: कू.मानसी सुर्यकांत तादलापुरकर चि नागराज सूर्यकांत तादलापुरकर व समस्त शोकाकुल तादलापुरकर परिवार व मातोश्री महादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था दादाश्री मोटर ड्राइविंग स्कूल