किनवट कोविड केअर सेंटर नवीन तहसील कार्यालयातच ठेवण्यात यावे-प्रकाश गब्बा राठोड
किनवट(आनंद भालेराव)
किनवट कोविड केअर सेंटर नवीन तहसील कार्यालय यातच ठेवण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी कीर्तिकुमार पुजार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नवीन तहसील कार्यालयातील शहरातील कोविड केअर सेंटर कोठारी येथील एका खासगी संस्थेच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. काही रुग्णांना येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु मौजे कोठारी येथील इमारत ही रुग्णांकरिता गैरसोयीची ठरत असून त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्ण उपचाराअभावी दगावला जाऊ शकतो. तर रुग्णाच्या नातेवाईकांना हे कोविड सेंटर गैरसोयीचे ठरत आहे.
रुग्णांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा, व औषधी पुरविण्याकरिता ये-जा करण्याकरिता लॉकडाऊन मुळे वाहने उपलब्ध नसल्याने गोरगरीब जनतेची गैरसोय होत आहे. याबाबत विचार करून आपण सध्या स्थितीत किनवट शहरातील नवीन तहसील कार्यालय येथे असलेल्या कोविड केअर सेंटर मध्येच किमान दोन महिने चालू ठेवावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.