किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कै.पुष्पाताई महल्ले यांच्या स्मरणार्थ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान तेरवीचा खर्च टाळून खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांचा सामाजिक उपक्रम

नांदेड: तेरवी या हिंदू धर्मातील एक असलेल्या संस्कारावरील अनाठायी खर्च टाळून त्या खर्चातून गरजू रुग्ण नातेवाईकांना अन्नदान देण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी शिदोरी या सामाजिक उपक्रमाची सुरवात केली . येथील श्री.गुरुगोविंद सिंग शासकीय रुग्णालयात उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले यावेळी खासदार हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर , जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील , अधिष्ठाता डॉ.म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ. लहाने ,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंद तिडके, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, उपजिल्हाप्रमुख पप्पू जाधव, भाविसे माजी प्रदेश चिटणीस प्रवीण जेठेवाड, शहरप्रमुख तुलजेश यादव, शहर संघटक अवतारसिंग पहरेदार, गौतम जैन , कामगार सेना जिल्हाप्रमुख सुरेश लोट , कृउबा संचालक दत्ता पाटील पांगरीकर , अशोक उमरेकर, ,बाळासाहेब देशमुख तरोडेकर , रमेश कोकाटे , शैलेश सिंह रावत यांच्यासह तुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका लता पाठक , रुग्णालयातील परिचारिका तरडे मॅडम , राठोड मॅडम आदी उपस्थित होते .
खासदार हेमंत पाटील यांच्या सासू व गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मातोश्री तथा यवतमाळ येथील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कै. बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी कै. पुष्पाताई महल्ले यांचे 27 एप्रिल रोजी कोरोना आजाराने मुंबई येथे निधन झाले होते.शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून मुंबई (वरळी )येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .हिंदू धर्मात मृत्यूनंतर तेरवी संस्काराला महत्व आहे, परंतु खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांनी या कार्यक्रमावर होणारा अनाठायी खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविले जेणेकरून समाजातील गोरगरीब जनतेला याचा लाभ झाला पाहिजे.सध्या सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांचे आणि नातेवाईकाचे जेवणाआभावी नांदेड शहरात लॉकडाऊन असल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत .त्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून नांदेड आणि हिंगोली येथील रुग्णालयात दररोज एक हजार रुग्ण नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी” शिदोरी ” या सामाजिक उपक्रमाला सुरवात करण्यात आली.सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत रुग्ण नातेवाईकांना जेवण दिले जाणार आहे हा उपक्रम पुढील एक महिना चालणार आहे.मागील महिनाभरापासून नांदेड आणि हिंगोली येथे शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.व त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत.त्यांच्या जेवणाची आणि झोपायची कुठेच सोय नसल्याने प्रचंड हाल होत आहेत.अश्या गरजू गोरगरीब रुग्णाच्या नातेवाईकांची भूक मिटविण्यासाठी व त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून श्री.गुरुगोविंद सिंगजी कोविड रुग्णालय, नांदेड येथे वरण -भात, भाजी -पोळी ची सुविधा करण्यात आली आहे.ज्यांची कुठेही जेवणाची सोय नसेल अश्या गरजू नातेवाईकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांनी केले आहे .

272 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.