अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर अखेर उपसभापती पदाची माळ काँग्रेसच्या गोदावरी बाई कदम यांच्या गळ्यात!
$ माजी आमदार वसंतराव चव्हाण पुन्हा धर्माबाद च्या राजकारणात यशस्वीरित्या सक्रिय
$ आगामी नगरपालिका निवडणुकीवर होणार परिणाम
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.26. जिल्यातील धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती निवडीच्या अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर अखेर उपसभापती पदाची माळ ही बाजार समितीच्या काँग्रेसच्या संचालिका तथा माजी सभापती व काँग्रेसचे विद्यमान तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर यांच्या सुविद्य पत्नी गोदावरी बाई कदम यांच्या गळ्यात पडली असून, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर व माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर यांना हा जबरदस्त धक्का मानल्या जात आहे.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर व बाजार समितीचे माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर यांना जबरदस्त धक्का
बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीच्या प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच राजकीय वातावरण तापले होते. बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक गणेशराव पाटील करखेलीकर यांनी संचालक राजू पाटील बोळसेकर यांनाच उपसभापतीपद देण्यात यावे असा हट्ट धरला होता. पण बाकी संचालकाला तो मान्य नव्हता. म्हणून नाट्यमय घडामोडीस प्रारंभ झाला. गोरठेकर गटाची बारा संचालकाची अभेद्य एकी असतानाही फक्त गणेशराव पाटील करखेलीकर यांच्या अट्टाहासापोटी सदरील एकी भंगली! दरम्यानच्या काळात संचालक रमेश गौड यांनी स्वबळावर उपसभापती पदाच्या शर्यतीत मोठी मोर्चेबांधणी केली होती. व बहुतांशी या गटातील संचालकांचा त्यांना पाठिंबाही मिळत होता. पण रमेश गौड यांना गणेश राव आन कडून विरोध झाला. अशा परिस्थितीत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी या निवडी प्रक्रियेत लक्ष केंद्रित केले. फक्त सहा संचालक असतानाही त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने गोरठेकर गटातील सहा संचालकांना आपल्याकडे वळवले! त्यामुळे त्यांच्याकडे दत्ताहरी पाटील आवरे, गोदावरीबाई कदम, रमेश गौड, शिवा मोकलीकर, गौस भाई, पदमीनबाई शिंदे शिवाजी पाटील बावडेकर वर्णी नागभूषण, श्याम सुंदर झंवर, व आनंदराव पाटील राजू पाटील बोळसेकर अशा अकरा जणांचा गट बनवण्यात ते यशस्वी झाले. यात विशेष म्हणजे गणेशराव पाटील करखेलीकर यांनी उपसभापती पदासाठी ज्यांचे नाव पुढे केले तेच राजू पाटील बोळसेकर हेही माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या गटात सामील झाले. व गोदावरी बाई कदम यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे व आपण बहुमत सिद्ध करू शकत नसल्याचे समजल्यामुळे गोरठेकर गटांमधील एकही अर्ज आला नाही म्हणून गोदावरीबाई कदम ह्या उपसभापती पदी बिनविरोध विराजमान झाल्या.
मागच्या काही वर्षापूर्वीचे समीकरण बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे पाहता आमदार वसंतराव चव्हाण यावेळी पूर्ण शक्तिप्रप्रदर्शनासह आपल्या जवाजमा सह धर्माबाद शहरात दाखल झाले होते. त्यावेळी थोडेसे वातावरण तापले होते. पण गोरठेकर गटाकडून कुठलेही शक्तिप्रदर्शन यावेळेस झाले नाही.
उपरोक्त निवडीमुळे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा धर्माबादच्या राजकारणात यशस्वीरीत्या चंचुप्रवेश झाला असून, आगामी धर्माबाद नगरपालिका निवडणुकीमध्येही त्याचे परिणाम विरोधकांना भोगावे लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ तर बापूसाहेबांनी सोडली भाजपची साथ’ म्हणून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी दाखवला धर्माबाद बाजार समितीला काँग्रेसचा हात’अशा चर्चा उपरोक्त निवडीनंतर आमदार वसंतराव चव्हाण म्हणजेच पर्यायाने काँग्रेस व मित्र पक्षांकडून उमटत आहेत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर वसंतराव चव्हाण गटाकडून मोठा जल्लोष केला.
उपरोक्त पार्श्वभूमीवर मात्र सर्व काही ठीक ठाक असतानाही फक्त अंतर्गत गटबाजीचा फटका हा भाजपासह राष्ट्रवादीलाही बसला.पर्यायाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर,माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर,व माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर तसेच विद्यमान सभापती राम पाटील बंन्नाळीकर यांनाही हा प्रचंड फटका बसला असल्याचे जाणकार बोलत आहेत.