स्व सुनिल ईरावार यांच्या स्मरणार्थ आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शिबिरात दोन हजाराच्यावर रुग्णांनी सहभाग नोंदविला
किनवट प्रतिनिधी
स्व सुनिल ईरावार यांच्या स्मरणार्थ आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शिबिरात दोन हजाराच्यावर रुग्णांनी सहभाग नोंदविला होता पैकी 400 पेक्षाअधिक रुग्णांना वर्धा येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात येणार आहे शिबिराच्या औचित्यावर 30 नागरिकांनी कोविशील्डची प्रथम व द्वितीय लस घेतली तर 50 जणांनी रक्तदान केले मागील दोन वर्षापासूनच्या कोरोनाकाळात नांदेड जिल्ह्यातील हे पहिलेच मोठे आरोग्य शिबीर ठरले आहे.
नांदेड पासून शेवटच्या टोकाला असलेल्या किनवट माहूर या मागास व दुर्गम तालुक्यातील गोरगरीब जनतेला तज्ञ डॉक्टरांच्या तपासणी व उपचाराचा लाभ व्हावा या हेतूने मनसेच्या वतीने शहराध्यक्ष स्वर्गीय सुनिल ईरावार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी किनवट येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी,उपचार शिबीर व कोरोना लसीकरण कार्यक्रम आयोजित केला होता मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम होते तर सहा जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण एच पुजार, अभि प्रशांत ठमके, विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे सामाजिक वैद्यकीय अधिकारी शिंगणे आयोजक नितीन मोहरे,पाटील सर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला
ग्रामीण दुर्गम भागात आरोग्य शिबीरे आयोजित करणे आता काळाची गरज बनली आहे कोरोनासारख्या आपत्तीजनक काळात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून किनवटच्या मनसैनिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली याचा मला खरोखर अभिमान वाटतो असे प्रतिपादन मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी असून लोकहितासाठी पक्षीय भेदभाव न करता शिबिराला आवर्जून उपस्थित राहिलेले आ भीमराव केराम व कर्तव्यदक्ष सहा जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच पुजार यांचेही त्यांनी कौतुक केले. अध्यक्षीय भाषणातून आ भीमराव केराम म्हणाले की आरोग्याच्या दृष्टीने किनवट माहूर तालुके आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले आहेत त्यामुळे कोरोनासारख्या आपत्तीजनक परिस्थितीत आरोग्याला प्रथम प्राधान्य देत मी माझ्या निधीतून तात्काळ रुग्णवाहिका तसेच ऑक्सीजन प्लांट उपलब्ध करून दिलाआहे यापुढेही आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सदैव कटिबद्ध आहे
सहा जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकिरण एच पुजार यांनी आपल्या मनोगतातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देत किनवट माहूर तालुक्यातील नागरिकांनी मनात कसल्याही प्रकारचा भ्रम न ठेवता कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन केले प्रास्ताविक भाषणातून आयोजक नितीन मोहरे यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमिका विशद करत स्व सुनील ईरावार यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोरोना काळात किनवट तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने स्मृतीदिनाचे औचित्य साधून आम्ही हा शिबिराचा कार्यक्रम घडवून आणला.या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांचे परिपूर्ण निदान होऊन नवसंजीवनी मिळावी अश्या अपेक्षाही मोहरे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून स्व.सुनील ईरावार यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी आयोजित लसीकरण कॅम्पमध्ये 30 नागरिकांनी कोविसील्डची प्रथम व द्वितीय लस घेतली तर 50 जणांनी रक्तदान केले. सुनील ईरावार विचारमंचच्या वतीने रक्तदात्यांना व रुग्णांना फळे व बिस्किटाचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानींदे यांनी केले तर अनिल ईरावार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वैदयकिय सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर उमाटे,आरोग्य दूत कुंदन उदावंत, राजू सिरपुरे यांच्या नियंत्रणाखाली पाटील अकॅडमीच्या स्वंयसेवकांनी शिबिराला मोलाचे सहकार्य केले
शिबिर यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष रोहित भिसे, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद भंडारे, शहर सचिव गणेश कर्नेवार,अंबादास चव्हाण, स्वप्नील कोटपेट, राम वानखेडे, पंकज पाटील, अमोल तोटरे, कुलदीप भवरे, प्रवीण दोनकोंडवार, गौतम वाघमारे, पवन साळुंखे, विकास वाघमारे, संतोष पाटील कराळे, चंद्रकांत तम्मडवार, वैभव गंधे, वैभव कदम, मयूर गोडघाटे, अक्षय राठोड, राहुल बत्तुलवार, सतिश चौलवार, श्रीकांत मरस्कोल्हे, यांनी परिश्रम घेतले