नांदगाव येथील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चा लाभ मिळत नाही.तो द्यावा अन्यथा 19 ऑगस्ट पासून आंदोलन.
किनवट: मौजे नांदगाव तालुका किनवट येथील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चा लाभ मिळत नाही. निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून ऑनलाईन दाखल केलेले ते प्रस्ताव मंजूर झाले म्हणजे ॲक्टिव झाले आहेत. ॲक्टिव झालेल्या ऑनलाइन वर काही हप्ते देण्यात आली असे दाखवलेले आहे. ते हप्ते आमच्या नावे जमा झाल्याचे दाखविले आहे.
परंतु प्रत्यक्षात आमच्यापैकी एकाही शेतकऱ्याला एक हप्ता मिळालेला नाही.अशाप्रकारे शासनाने आमचे विरुद्ध लपंडाव खेळले तर आमच्या भविष्यत भरून निघणारी आर्थिक नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर शासकीय व खाजगी कराचा बोजा निर्माण झाले तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही व आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.
तरी मेहरबान साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर म्हणजे दिनांक 17/ 8 /2021 पर्यंत पंतप्रधान सन्मान निधी योजनेचे मागील व पुढील सर्व हप्ते देऊन उपकृत करावे नसता आम्ही दिनांक 19/ 8 /2021रोजी सकाळी 10 वाजता कार्यालया समोर उपोषणाला बसून आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी सादर केले असून प्रशासन काय निर्णय घेते या कडे शेकऱ्यांचे लक्ष लागून आहे.