पदमा गिऱ्हे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कारांनी सन्मानित.
श्री क्षेत्र माहूर/नांदेड
माहूर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिक्षिका पत्रकार तसेच अनेक संघटनांचे काम करणाऱ्या फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार पेरणाऱ्या सौ. पद्मा जयंत गि-हे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने नारीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार नांदेड येथे कुसुम सभागृह सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात दिनांक 11 सप्टेंबर रोजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मंचावर धनंजय शिंदे ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर ,गणेश आनंद, कदम प्राध्यापक किशन इंगळे, व्यकटराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात पत्रकार सौ पद्मा जयंत गिऱ्हे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आतापर्यंतच्या जीवन काळाच्या यात्रेत पदमा गिऱ्हे यांनी सावित्रीमाई व राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला तसेच समाजातील तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला आवर्जून हजर असणाऱ्या त्यांना या कार्याची पोचपावती मिळाली तसेच भविष्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यात महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले यांनी केलेल्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन आपण काम सतत कायम करत राहू असे सौ. गिऱ्हेनीं आश्वासन दिले. त्यांचे मिस्टर श्री.जयंत गिऱ्हे यांनी त्यांना अनमोल सहकार्य साथ दिली. या पुरस्काराने पुरस्कृत झाल्या बद्दल सौ.पदमा गिऱ्हे यांना अभिनंदनाचा सर्वत्र वर्षाव होत आहे.किनवट माहूर विधानसभा मतदार संघांचे आमदार मा.भीमरावजी केराम साहेब, अध्यात्मिक जिल्हा आघाडी परमपूज्य श्याम भारती महाराज,माहूर न. प.नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव,भाजपा जेष्ठ कार्यकर्ते धरमसिंग राठोड, प्रदेश सदस्य संध्याताई राठोड, श्री.अशोकराव पाटील सूर्यवंशी, ऍड.रमण जायभाय,रेणुका देवी महाविद्यालय संचालक श्री.प्रफुलजी राठोड.श्री.प्रकाशजी कुडमते,भाजपा माहूर तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने,भाजपा अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष संजय पेदोर, जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड , सदाशिव राठोड, अध्यात्म आघाडी जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार जोशी, जिल्हा सरचिटणीस अनिल वाघमारे.ज्येष्ठ पत्रकार विजयजी आमले,ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे,अपील बेलखोडे, निळकंठ मस्के,डी. डी. चव्हाण,नंदू कोलपवार ,राम दातीर, संजय घोगरे, राजू दराडे,जयंत गि-हे, सुरेश गि-हे,पवन कोंडे, एस.एस. पाटील सर,मा.नगराध्यक्ष शितल जाधव, शोभाताई महामुने, छायाताई राठोड,शहराध्यक्ष सौ.अर्चना दराडे, सह्याद्री पब्लिक स्कूल प्राचार्य सौ.जयश्री चव्हाण, निर्मला जोशी, ममता गायकवाड, सौ.दिपमाला अग्रहारी ,सौ.अपर्णा पाटील, प्रतिभा पाटील, यांच्या सह विविध पक्षांचे कार्यकर्ते पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला.