भ्रष्ट परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची बे हिशोबी मालमत्ता जप्त करण्याच्या मागणी साठी माकपचे आरटीओ कार्यालया समोर उपोषण
नांदेड( प्रतिनिधी )
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा च्या वतीने दि. ५ आॕगस्ट सकाळी ११.३० वाजता पासून प्रादेशीक परीवहन कार्यालया समोर भ्रष्ट उप परीवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या गैर कारभाराची चौकशी करून त्यांच्या वर कार्यवाही करावी तसेच अवैध रेती वाहतूक करणारी गाडी नं.MH04 DK 5270 गाडी मालक व्ही. एस. तिरनकर व अन्य दोघांना आर्थिक देवाण घेवाण करून वाचविणाऱ्या अधिकार्यांना निलंबित करून त्यांची सी.बी. आय. चौकशी व खाते निहाय चौकशी करावी या मागणीसाठी मार्क्सवादी पक्षाचे सेक्रेटरी गंगाधर गायकवाड व मारोती केंद्रे यांनी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे .
नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे, त्या त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालया मधील अनेक भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत विशेषता अविनाश राऊत या सर्व भ्रष्ट कारभारासाठी जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्यता महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त ढाकणे डाॅ. अविनाश ढाकणे यांचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी यांचा वर कार्यवाही करावी तसेच परिवहन कार्यालयातील सुशोभीकरण कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी , भ्रष्ट अधिकारी अविनाश राऊत व तिरनकर यांची गाडी आर्थिक उलाढाल करून सोडणाऱ्या अधिकारी यांना निलंबित करून त्यांचा मालमत्तेची चौकशी करावी मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील असे मार्क्सवादी पक्षाचे सेक्रेटरी गंगाधर गायकवाड यांनी सांगितले. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाशिष कामेवार यांनी तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी (यु),चे प्रा.कॉ.देविदास इंगळे,कॉ.ईरवंत सुर्यकार,कॉ.गोपाळ वाघमारे,कॉ.नितीन गादेकर,सोनाजी कांबळे भारतीय लहुजी सेना, टायगर आटोरीक्षा संघटना, जय संघर्ष वाहण चालक, मालक संघर्ष संघटना, अखिल भारतीय अंध्रश्रद्धा समीती, लहुजी शक्ती सेना यांनी आंदोलनाला प्रत्यक्षात भेटून पाठिंबा दिला आहे.
–