वानोळा परिसरात मोबाईल टावर बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व ऑनलाइन केंद्राचे नुकसान
वानोळा: माहूर तालुक्यात लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यातून दुसरा नंबर असलेल्या वानोळा तालुका माहूर येथील कोणत्याच प्रकारचे मोबाईल टावर नसल्यामुळे विद्यार्थी तसेच नेट करी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या ठिकाणचे बीएसएनएल टॉवर असून नसल्यात जमा आहे. ह्या गावात इ सेंटर आहे परंतु नेट असल्यामुळे या गावांमध्ये कोणतीही ऑनलाईन चे कामे होत नाहीत. त्यासाठी माहूर या तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करावी लागते. छोट्या-मोठ्या कामांनाही माहूर या ठिकाणी जावे लागत आहे या भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी नेटची व्यवस्था करण्यासाठी मा.खासदार हेमंत पाटील यांनी लक्ष घालून या भागातील bsnl टावर लवकरात लवकर दुरुस्ती करून जनतेच्या सेवेसाठी देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील विद्यार्थी, पालक, शेतकरी व ऑनलाइन केंद्र यांच्याकडून होत आहे.