जोशीज् कोचिंग क्लासेसच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘रक्तदान व नेत्रदान’ कार्यक्रम सम्पन्न
विजय जोशी,किनवट:
आज दिनांक 31/07/2021 शनिवार रोजी ‘जोशीज् कोचिंग क्लासेसच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘रक्तदान व नेत्रदान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला किनवट वासीयांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला .*
*या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून किनवट उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्री मा. धुमाळे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून किनवटचे पोलीस उपअधीक्षक मा. श्री मंदार नाईक साहेब तर अध्यक्ष म्हणून जोशीज् कोचिंग क्लासेसचे संचालक श्री सदाशिव जोशी सर हे होते. याप्रसंगी श्री गोपाल तुम्मलवार सर व डॉ . तेलंग सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली .तसेच श्री मारोती सुकंलवाड दादा, सामनाचे पत्रकार डहाके सर व किनवट नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अजय भाऊ चाडावार,भावना ताई दिक्षीत व प्रा . राजकुमार नेम्मानीवार सर यांनी नेत्रदान करून आपले योगदान दिले*
*याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री मा.डॉ धुमाळे साहेबांनी नेत्रदान व रक्तदानाचे महत्त्व विशद केले . “15 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जोशी सरांनी आज वर्धापनदिनानिमित्त घेतलेला कार्यक्रम अंत्यत स्तुत्य आहे तसेच इतरांनीही याचे अनुकरण करावयास हवे” असे मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे श्री मा.मंदार नाईक साहेबांनी सामाजिक बांधिलकीसाठी आजघडीला रक्तदान व नेत्रदान किती आवश्यक आहे याची जाणीव करून दिली. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशीज् कोचिंग क्लासेसचे संचालक श्री जोशी सरांनी रक्तदान व नेत्रदान किती महत्त्वाचे आहे व “मृत्यूपश्चात नेत्र तर जळून खाकच होणार आहेत त्याऐवजी मुत्यूपश्चातही आपले डोळे इतरांना हे जग दाखवू शकतात हि भावनाच आनंददायी आहे, तसेच नेत्रदानातून अंध व्यक्तींच्या जीवनात कसा प्रकाश आणू शकतो याचीही जाणीव करून दिली. कोरोनाकाळात रक्तदान करुन आपण अनेक लोकांचे प्राण वाचवू शकतो, या पेक्षा मोठे पुण्य ते काय? “असे मनोगत व्यक्त केले.*
*या वेळी 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 46 नेत्र दात्यांनी नेत्रदान केले तसेच सर्व मान्यवरांनी व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळूण स्वर्गीय प्रा. किशनराव किनवटकर सर यांना श्रद्धांजली अर्पित केली.*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनंतवार सर यांनी केले तर यावेळी जोशीज् कोचिंग क्लासेसचे शेख सत्तार सर, चांदूरकर सर, शेळके सर, प्रशांत सर,कृष्णा सर , जाधव सर ,केंद्रे सर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले*.
*सर्व नेत्रदात्यांचे व रक्तदात्यांचे नाव नमूद करणे शक्य नाही परंतू त्यांचे मनःपुर्वक आभार व्यक्त करतो*