प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मातृदिन साजरा
सोलापूर : करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने मातृदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांचे महत्व व त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून आभ्यास करावा व चांगल्या प्रकारे यश संपादन केले पाहिजे असे मार्गदर्शन केले. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सचिव प्रमिला जाधव यांनी आई म्हणजे काय असते. आईची अपेक्षा व्यक्त करतांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या विचारांतून मुलांना योग्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे शिक्षक विवेक कांबळे सर मार्गदर्शन करताना म्हणाले की, ज्यांना आई नसते त्यांना तुम्ही विचारा आई म्हणजे काय असते.? त्यांनी आपल्या आईबद्दल मनामध्ये असलेले प्रेम व्यक्त केले. तसेच त्यांनी भावनिक शब्दात त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रजनी मॅडम यांनी आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. तसेच उपस्थित विद्यार्थीनीने आपले आईबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केले. यामध्ये कु. रुपाली पवार, वैष्णवी गायकवाड, स्नेहल लोखंडे, निशा कोकाटे, रणजित पवार या विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा सौ. आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे शिक्षक निकत सर, विवेक कांबळे, गणेश दहीटनकर, रजणी मॅडम तसेच सर्व ग्लोबल सायन्सचे विद्यार्थी उपस्थित होते.