किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट हिंदू स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन

किनवट: हिंदू स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी माजी पाणीपुरवठा सभापती अजय शंकरराव चाडावार यांनी नगर परिषदेच्या मुख्यअधिकारी कडे केली आहे.
हिंदू समशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचे पाणी साचत असल्यामुळे अंत्यविधीला जाता असताना गटारीच्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना स्मशानभूमीकडे जावे लागत आहे. संध्याकाळच्या वेळेस जर स्मशान भूमीकडे अंत्यविधीला जायचे असेल तर लाईटचे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले असते. त्यामुळे मार्ग काढणे जिकरीचे होऊन बसले आहे. साप विंचू इतर सरपटणाऱ्या प्राण्यावर जर पाय पडला तर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगरपालिका अनेक विकासाची कामे केल्याचा डंका पिटवात असते. जिथे रोड ची आवश्यकता आहे तिथे रोडच नाहीत, जिथे आवश्यकता नाही तिथे डबल रोडवर रोड बनवल्या जातात. जिथे नाल्याची आवश्यकता आहे तिथे नाल्याच नाहीत तर जिथे आवश्यकता नाही तेथे नालीवर नाली बनविल्या जाते , जिथे लाईटची आवश्यकता आहे तिथे लाईटच नाहीत व जिथे लाईटची आवश्यकता नाही तिथे हायमोक्स लाईट बसविण्यात आले आहेत,हिंदू स्मशानभूमीचाही रोड अत्यंत महत्त्वाचा असून याकडे नगरपालिका का पाठ फिरवते हे कळायला मार्ग नाही अनेक वेळेस निवेदन देऊनही सदरील रस्ता दुरुस्त झाला नाही.
तेव्हा नगरपालिकेच्या वतीने सदरील रस्त्याचा सर्वे करून ताबडतोब दुरुस्तीसाठी घ्यावा अन्यथा जनतेला सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल असे निवेदन अजय चाडावार यांनी दिली आहे.

21 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.