दुर्दैवी घटनेने मरडगा गांव हळहळले ; नाथ्याने गळफास घेतल्याचे कळताच आत्याने प्राण सोडले
नांदेड :
हदगांव तालुक्यातील एकनाथ यादव गजभारे वय ३२ वर्ष हा नांदेड शहरात भावसार चौक येथे भाड्याच्या खोली मध्ये पत्नी, सासूबाई, मावस सासरा, मावस सासू यांच्या सोबत रहात होता.
मिळेल ती नाक्यावरील कामे करून तो कुटुंबियांचा गाडा चालवायचा.
८ डिसेंबर रोजी एकनाथ ने खोलीचे दार बंद करून आतमध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतला.
त्याला भाग्य नगर पोलिसांनी मिळालेल्या माहिती प्रमाणे विष्णुपुरी येथील शासकीय दवाखान्यात शव विच्छेदना साठी नेले.
मरडगा येथे अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे नियोजन सुरु होते.
मयत्ताचे आई – वडील आणि इतर नातेवाईक दवाखान्यात थांबून होते.एकनाथ यास नाथ्या म्हणून बोलत व ओळखत होते.
नाथ्याच्या माधव नावाच्या काकाने कळमनुरी येथील आपल्या धुरपता नावाच्या बहिणीला ही घटना फोन वरून कळविली.
घटना ऐकताच धुरपतबाईंना धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी प्राण सोडले.
भाच्याच्या मृत्यूची बातमी ऐकून आत्याने प्राण सोडल्याने मरडगा गांव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नाथा च्या कुटुंबियांना आत्महत्ये बाबत शंका असून लवकरच ते पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार असल्याचे बोलले जात आहे.
अशी माहिती मरडगा येथील माजी उप सरपंच तथा एकनाथचे काका श्री साहेबराव गजभारे यांनी दिली आहे.