विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज दाखल
, दि. 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबर पर्यंत 2
उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
आज राष्ट्रीय पक्षाचे तसेच सध्याचे विधानसभा सदस्य असलेल्यांपैकी 83-किनवट मतदारसंघात एका उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत दोन उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार भीमराव रामजी केराम (एबी फॉर्म अप्राप्त) यांचा समावेश आहे. काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अर्जून आडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
आज दिवसभरात किनवटमधून 6 इच्छूकांनी 14 अर्ज प्राप्त केले आहेत. आतापर्यंत (24 ऑक्टोबर 2024 ) 40 इच्छुकांनी 99 अर्ज प्राप्त केले आहेत. त्यापैकी दोघांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.