दुर्गादेवी उत्सव समिती व नव युवक मंडळ कमठालाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
किनवट/प्रतिनिधी: दुर्गादेवी उत्सव समिती व नव युवक मंडळ कमठालाच्या वतीने नवरात्र उत्सवा निमित्त कमठाला येथे दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमठालाचे उपसरपंच बालाजी भरकड होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर के.पी.गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी किनवट होते. प्रमुख मान्यवर म्हणून किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनीलजी बिर्ला साहेब उपस्थित होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून 18 वर्ष पूर्ण झालेल्या पासून ते 65 वर्षापर्यंतच्या 50 किलो वजन असलेल्या सर्व बंधू-भगिनी रक्तदान करावे. रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया ही सुरळीत चालते. अपघात झालेल्या व्यक्तीस किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त असलेला व्यक्ती रुग्णालयात असल्यास त्यास जर रक्ताची आवश्यकता भासल्यास या रक्तदान शिबिरातून संकलित केलेल्या पतपेढीतून त्यांना रक्त देण्यात येते. आपल्या रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचू शकतो असे विचार डॉक्टर के पी गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी किनवट यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात विचार व्यक्त केले. कार्यक्रमास तंटामुक्ती चे अध्यक्ष शिवाजी पाटील कराळे, मा. अध्यक्ष लक्ष्मण देवसरकर, पेसा समितीचे अध्यक्ष अशोक नैताम, कैलास सोनटक्के अध्यक्ष शालेय शिक्षण समिती,अशोक पवार, राजू घोडाम, शंकर कोहचडे, संतोष भरकड,घनश्याम कराळे, सुरेश कराळे, सुनील कराळे, भारत भरकड, राजाराम याटेवाड, एकनाथ गाडगे, मारोती गेडाम ,विजय कोथळे, दिलीप मोहजे, रेश्मा ढोरे सिस्टर, पुनम भरकड आशा वर्कर ,प्रभाबाई भरकड, शेषाबाई कराळे ,मनकर्णाबाई भोयर,चंद्रभागाबाई गेडाम उपस्थित होते. 23 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकाश तीरमले, सुनील उईके ,मारुती मन्ने, उमेश भोयर, जय कराळे, सुरज भिसे यांनी प्रयत्न केले.