दहशत माजवीनाऱ्या गुंडा विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, वंजारी समाज बांधवानी केली अमितशहा कडे मागणी
किनवट/प्रतिनिधी: आज किनवट उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे कलेक्टर मार्फत देशाचे गृहमंत्री मा. ना.श्री.अमितभाई शहा यांना निवेदन देण्यात आले,जैनूर -आदिलाबाद(तेलंगणा)येथे आदिवासी महिलेवर एका नराधमाने केलेल्या अत्याचाराचे प्रकरण “राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार”कडे स्वतंत्र खटला चालवावा, काही समाज कंटाकांनी वंजारी समाज आणि इतर हिंदू समाजाच्या लोकांचे घरे -दुकान जाळून जवळपास 25 कोटी रुपयाच्यावर नुकसान केलेल्या घटनेची C.B.I मार्फत नि:पक्षपातीपणे चौकशी करावी आणि दहशत माजवीनाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी आज किनवट येथील समाज बांधवानी देशाचे गृहमंत्री मा.ना.अमितभाई शहा यांना केली आहे.
यावेळी आत्माराम मुंडे पाटील, प्रा. गोवर्धन लांब सर, रामदास गुट्टे, बालाजी(बंटी)फड,दिगंबर मुंडे, गणेश कोटलवार,बालाजी आत्राम, कृष्णा मेश्राम इत्यादी जण उपस्थित होते 🙏