मोकाट फिरते कुत्र्याने एका मुलीला केले गंभीर जखमी: मोकाट फिरत्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
किनवट/प्रतिनिधी: मोकाट फिरत्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करणारे निवेदन किनवट चे सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे नितीन पवार यांनी सादर केले आहे.
लेक्चर कॉलनी गोकुंदा येथील रहिवासी असलेल्या नितीन पवार यांची मुलगी श्रद्धा ही शाळेतून दिनांक 10 सप्टेंबर रोजी घरी येत असताना मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याने तिला अचानक चावा घेतला व गंभीर जखमी केले.तिलाशासकीय रुग्णालय गोकुंदा येथे दाखल करण्यात आले होते. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने येथून तिला आदिलाबाद येथे रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार चालू आहेत.
गोकुंदा शहर तसेच किनवट शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेक लहान मुलांना व वृद्ध आबाल यांना कुत्रे चावा घेत आहेत. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन ताबडतोब या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी किनवट व गोकुंदा शहरातून होत आहे.