महाकवी वामनदादा कर्डकांना स्मृतिदिनी किनवटमध्ये वाहिली स्वरांची आंदराजली
किनवट : आदीजन संस्था संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमीच्या वतीने राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे महामानवासह देशभक्ती, कष्टकरी, निसर्ग, पर्यावरण, स्त्रीप्रधान, प्रेमकाव्य, विडंबन गीते, चित्रपट गीते लिहिणारे कवी , संगीतकार वामनदादा कर्डक यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त स्वरांची आंदराजली वाहून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंडू भाटशंकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. आनंद भालेराव , वसंत सर्पे, मनोहर साळवे उपस्थित होते. तबला विशारद प्रा. शिवकुमार कोंडे, राहुल तामगाडगे यांच्या हस्ते भ. बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर,वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमापूजनानंतर वंदना घेण्यात आली.उपस्थित विद्यार्थी व रसिकांना संगीत अलंकार, राग रागिणी, सुर, ताल , लय इ. माहिती संचालक सुरेश पाटील, प्रा शिवकुमार कोंडे यांनी दिली
आर्यन मुजमुले, स्पर्शिका पाटील,आयुष्या मुजमुले, कामराज माडपेल्लीवार, कवी रमेश मुनेश्वर (राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक ), प्रा. डॉ. आनंद भालेराव, सुनंदा पाटील, भाग्यवान खोब्रागडे , दीपाली गिमेकर , मनीषा साळवे यांनी प्रबोधन गीते सादर केली. महाकवि वामनदादा कर्डक यांच्या “भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते…. ” हे संदेश गीत सादर करून सुरेश पाटील यांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास उत्तम कानिंदे, रमाकांत गायकवाड, मुकूंद मुनेश्वर, चंद्रशेखर सर्पे, आनंद गिमेकर, सुषमा पाटील, पुष्पलता गायकवाड, सुनिता पाटील, उषा मुजमुले, दीपाली रामटेके, अनिकेत रामटेके, प्रतिक भाटशंकर, सुनिल इंगोले उपस्थित होते