महात्मा फुले विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवापुर्ति निमित्त सत्कार संपन्न
किनवट,दि.३: मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी(ता.किनवट व्दारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा( किनवट) येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सेवापुर्ती सोहळा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी(दि.१) रात्री आठ वाजता मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल, कोठारी( ता.किनवट) येथे उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम हे होते. प्रमुख पाहुणे आनंदराव वाढे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी,नांदेड, अनिल महामुने, अधिक्षक, शालेय पोषण आहार,किनवट, सौ.शुभांगीताई ठमके, प्राचार्या म.ज्यो.फुले क.म.वि.घोटी,म.ज्यो.फुले.मा.व.उमावि. गोकुंदा, किनवट संस्थेचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा, किनवट चे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके,आनंद मच्छेवार,माजी नगराध्यक्ष,किनवट आदी विचारमंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अतिथी देवो भव्य ! या भारतीय संस्कृतीला जपत आलेल्या मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए.पी.जुनगरे यांनी या सेवापुर्ती सोहळ्याच्या आयोजना मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली.
या सेवापुर्ती सोहळ्यात तब्बल १२ कर्मचाऱ्यांना सहकुटुंब शाल, पुष्पगुच्छ आणि वस्त्ररूपी भेट देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये पूर्व मुख्याध्यापक एच.ए.शेख, उपप्राचार्य एस.के.राऊत, उपमुख्याध्यापक जे.एस.पठाण, पर्यवेक्षक,एस.डी.वाठोरे,
पर्यवेक्षक श्री.व्ही.ए.चव्हाण, श्रीमती एम.एस.सर्पे, वरिष्ठ लिपिक श्री.ए.एम.सर्पे,श्री.आर.एच. येरेकार,श्री.एस.जी.तम्मेवार, श्री.पी.जी.घुले ,श्री.जी.डी.दामोधर, सेवक एन.एस.देवतळे यांचा समावेश होता.
या सेवापुर्ती सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करतांना आंनदराव ठमके व मातोश्री कमलताई ठमके यांनी जे इवलसं रोपट लावलं होतं त्याचा वटवृक्ष होत असताना “यांची देही याची डोळा” पाहण्याचा योग अभियंता श्री. प्रशांत ठमके आणि सौ.शुभांगीताई ठमके या दाम्पत्यामुळे आला,असे भावपूर्ण उद्गार सत्कारमुर्तीनी काढले.
याप्रसंगी कृतज्ञ भावनेने प्रा.मायावती सर्पे यांनी संस्थेच्या विद्यार्थी सहाय्यता कक्षाच्या दोन विभागास एकविस हजार रूपयांचे दोन धनादेश
मुख्याध्यापक तथा प्राचार्य ए.पी.जुनगरे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाधीन केले.
अध्यक्षीय समारोप करताना आमदार भीमराव केराम यांनी यांनी संस्थेचे सचिव अभि.श्री.प्रशांत ठमके व कोषाध्यक्षा सौ.शुभांगीताई ठमके यांनी किनवट सारख्या आदिवासी बहुल भागात जो शैक्षणिक आलेख उंचावत ठेवला आहे त्या बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेच्या वतीने जो सेवापुर्ती आनंद सोहळा आयोजित करण्यात आला तो खऱ्या अर्थाने पारिवारिक सोहळा भासला, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य आर.ए.जाधव, उपमुख्याध्यापक पी.जी.मुनेशवर, पर्यवेक्षक किशोर डांगे सर, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर,बंडु भाटशंकर सर,प्रशांत डवरे सर,आदींनी परिश्रम घेतले.या सेवापुर्ती समारंभास मोठ्या संख्येने पत्रकार बांधव, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक, मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते सदर कार्यक्रमा सूत्रसंचलन पर्यवेक्षक प्रा.एस.ए.बैसठाकुर यांनी केले तर आभार प्रज्ञा मॅडम यांनी मानले.