किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सरस्वती विद्या मंदिर विद्यालया ने आपली उज्वल यशाची परंपरा या वर्षी सुद्धा ठेवली कायम

किनवट प्रतिनिधी
उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परिक्षेत किनवट येथिल सरस्वती विद्या मंदिर विद्यालया ने आपली उज्वल यशाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे . या शाळे चा विज्ञान विभागाचा निकाल १००% तर कला शाखेचा निकाल 79% इतका लागला आहे . विज्ञान शाखेतून सुंकरवार शरयु विकास हिने 89.67% गुण घेवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे तर कला शाखेतु न मुंडे सिद्धीशा विठ्ठल या विद्यार्थीनीने76.50% गुण घेवुन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे या यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थाचालक व्यंकटराव नेम्मानी वार मुख्याद्यापक कृष्णकुमार नेम्मानीवार यांनी अभिनंदन केले
उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे . या परिक्षेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे या शाळेतील एकुन 161 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची परिक्षा दिली होती 42 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण प्राप्त केले आहे 84 विद्यार्थी प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त केले आहे तर सुंकरवार शरयु विकास हिने 89.67% घेवून प्रथम येणाच्या मान पटकाविला आहे व्दितीय रेजितवाड अर्जुन बालाजी तर श्रिमनवार तनुश्री रमेश या विद्यार्थीनिने तृतीय क्रमांक पटकावला आहे
विज्ञान शाखे बरोबर च कला शाखेतील विद्यार्थ्यानीही गुणवत्तेत बाजी मारली आहे कला शाखेतील 176 विद्यार्थ्या पैकी 30 विद्यार्थीनीप्रथम श्रेणी 85 विद्यार्थीनी व्दितीय श्रेणीचे गुण प्राप्त केले आहे एका विद्यार्थीनी विशेष प्राविण्य मिळवले आहे
कला शाखेत मुंडे सिद्धीशा विठ्ठल या विद्यार्थ्यीनीने 76.50% गुण घेवुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे
या यशाबद्दल सस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मनिवार मुख्याद्यापक कृष्णकुमार नेम्मानी वार पर्यवेक्षक पहुरकर सर यांच्या सह विद्यार्थी व पालक वर्गाकडून यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले जात आहे

598 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.