किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट च्या नागरीकांना पेट्रोल-डिझेल पासून मिळणार मुक्तता..!

किनवट :(तालूका प्रतिनिधी)
भारताला इंधनामध्ये स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे अथक प्रयत्न चालू असून त्याचाच एक भाग म्हणून CNG, PNG गॅस व सेद्रिंय खत तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने किनवट मध्ये CNG तयार होणारा असून मोटरसायकल, आटो, कार ह्या वाहनासाठी CNG गॅसपंम्प सुरु होणार आहेत. त्याच बरोबर घरगुती गॅस तयार होणार आहे. सेंद्रिय खत शेतक-यांना दोन वर्ष मोफत देऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर मालाला बाजारपेठ उपलब्ध करुण देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी सभासद होणे आवश्यक आहे.
बायो CNG म्हणजे गवत, काडीकचरा इत्यादी पासून नैसर्गिकरीत्या गॅस तयार करण्यात येतो. ज्यावर आता शहरातील मोटरसायकल, ऑटो, कार चालणार आहेत. त्यामुळे वाढत्या पेट्रोल व डिझेल किंमती पासुन कायमची मुक्तता तर किनवट तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण होऊन देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये वाटा उचलणार आहे.
बायो – CNG पासून शेतकऱ्यांनाही वर्षाला लाखोचे उत्पन्न एका एकर मध्ये मिळनार आहे. पुर्णपणे सेंद्रिय खतांवर आधारीत गवत शेतकर्‍यांनी शेतात लावायच आहे. त्यामुळे जमिनीच पत सुधारेल व गॅसही मिळेल. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून CNG अतिशय फायदेशीर असल्याने दुहेरी फायदा आता किनवट तालुक्यातील नागरीकांना मिळणार आहे.
किनवट शहरामध्ये व परिसरात बायो सीएनजी पंप सुरू होणार असून याची नोंदणी करणाऱ्याला नागरीकांना CNG मिळणार आहे. तेव्हा लवकरात लवकर एम.सी.एल, गव्हाणे बायोफ्युल व जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडे संपर्क करून याचे सभासद व्हावे आणि भविष्यामध्ये विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विनायक गव्हाणे ,चंपतराव जाधव ,सुरेश सोळंके पाटील, सौ.सुमनताई तिडके, राजु पाटील साळुंखे, बाळकृष्ण कदम, गौरव नेम्मानीवार यांनी केले आहे.

188 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.