*रक्तदाना सारखे सामाजिक उपक्रम रावबविल्यास अनेक रुग्णांना जीवनदान मिळेल…पो. नि.उदय खंडेराय*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२५.रक्तदाना सारखे सामाजिक उपक्रम रावबविल्यास अनेक रुग्णांना जीवनदान मिळेल असे प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका कालवश गंगाबाई नारायणराव कदम यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मंगेश कदम मित्रमंडळाच्यावतीनेआयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले.
पुढे बोलताना खंडेराय म्हणाले कि,मंगेश कदम यांचा आदर्श सर्वांनी घेऊन असे सामाजिक उपक्रम राबविल्यास रक्ताचा तुडवडा भासणार नाही.कदम आणि खंडेराय कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध हे पूर्वी पासूनच फार जुने असून मातोश्री गंगाबाई कदम यांचा वारसा मंगेशकदम हे पुढे नेत आहेत.
याप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार नारायणराव कदम,जात पडताळणी विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. मनीषा मंगेश कदम,डॉ.शिवाजी कागडे, बिलोलीचे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड,अँड धम्मपाल कदम हे उपस्थित होते.शिवसेना एस.सी.एसटी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांच्या मातोश्री स्मृतिशेष गंगाबाई नारायणराव कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त 24 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर व भन्ते विनयबोधी प्रिय यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध पूजापाठ, चिवरदान व भोजनदान कार्यक्रमा करण्यात आला.रक्तदान शिबिरात 180 रक्तदात्यांनी रक्तदान केले.संध्याकाळी प्रा.अविनाश नाईक यांच्या मिशन -ए – भिमक्रांती हा बुद्ध -भिम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी भन्ते पय्याबोधी,शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर,माजी जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी सुभाष खंडेराय, डॉ.रवी सरोदे परीक्षा नियंत्रक, राष्ट्रवादीचे नेते डॉ.उत्तमराव सोनकांबळे,बिलोली शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे पाटील,आंबेडकरी चळवळीचे रमेश सोनाळे, दिगंबर मोरे,सुभाष कटकांबळे,वंचित बहुजन आघाडीचे विक्की वाघमारे,प्रशांत इंगोले, नगरसेवक पंचशील कांबळे,प्रभू सावंत,संदीप मांजरमकर,जय मल्हारसेनेचे शिवकांत मैलारे, श्रीकांत गादगे,मारुती पाटील, अंकुश हिवराळे,भीमशक्तीचे सुरेश हटकर,संजय कौठेकर,प्रकाश दिपके,माजी नगरसेवक विनायक सगर,सखाराम तुप्पेकर,संतोष मुळे, माणिक देशमुख,गोविंद तोरणे,चंदू कसबे,ॲड.मंगेश जामनिक,ॲड.संघरत्न गायकवाड,ॲड.भिमरत्न कांबळे,ॲड बाळासाहेब कांबळे, संतोष पानकर,किशन पवनकर, संतोष पवार,यांच्यासह विविध पक्षाचे पुढारी,पदाधिकारी, अधीकारी,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,नातलग,महिला व पुरुष यांनी अभिवादन केले.मंगेश कदम मित्र मंडळाच्या वतीने नेहमी सामाजिक उपक्रम राबविले जातात.