भारतीय राज्यघटनेच्या सुंदर पक्षांची एक एक पिसे भाजप सरकार उपटत आहे!-एडवोकेट कमलेश चौदंते* *अनुसूचित जाती जमातीच्या रोजगारांच्या संधी झाल्या गारद
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१४.धर्माबाद तालुक्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांना जागतिक स्तरावर नॉलेज ऑफ द सिम्बॉल या नावाने ओळखले जाते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान करून सर्व जातींच्या कल्याणासाठी भारतीय राज्यघटनेचा सुंदर पक्षी बनवला होता.पण नरेंद्र मोदीच्या भाजपा पक्षाने या सुंदर पक्षांची एक एक पिसे उपटायला चालू केली असून अनुसूचित जाती जमातीच्या युवकांच्या रोजगाराच्या संधी गाजद होत असल्याचे चित्र आज घडीला जवळपास स्पष्ट झाले असल्याचे प्रतिपादन एडवोकेट कमलेश चौधरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या ३१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मौजे बन्नाळी येथे केले.
चंद्र संगीता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धर्माबाद यांच्या वतीने आयोजक शंकरराव गणपतराव वाघमारे हे गेल्या 31 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात करतात! आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात पहिल्या सत्रात पंचशील ध्वजारोहण ज्येष्ठ पत्रकार जी.पी.मिसळे यांच्या हस्ते करण्यात आले तर पूजापाठ बौद्धाचार्य सुभाष कांबळे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सदानंद देवके यांच्या हस्ते करण्यात आले.दुसऱ्या सत्रात सायंकाळी आठ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक एस्सी फॉरेस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ सल्लागार जे.केजोंधळे हे उपस्थित होते.
तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर,नगरसेवक प्रतिनिधी सोनुभाऊ वाघमारे,परमेश्वर कवळे,पुंडलिक कांबळे,गंगाधर लव्हाळे,गंगाधर धडेकर, सुदर्शन वाघमारे,रावसाहेब चौदंते,विद्याधर घायाळ,चैतन्य घाटे,जयवर्धन भोसीकर, पत्रकार एल.ए.हीरे प्रभु पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
आपल्या मनोगतात जेष्ठ पत्रकार एल.ए.हीरे यांनी नामांतर लढ्याच्या दरम्यान एक साक्षीदार म्हणून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक व्यथा मांडल्या.तर शिवराज पाटील होटाळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला कोणीही हात लावू शकत नाही असे प्रतिपादन केले.
*चौकट-*
भारतीय राज्यघटना जर बदलण्याचे प्रयत्न केले तर दलित पॅंथरचा लढा आठवा आणि पेटून उठा संघटित व्हा आणि भविष्यातील संकट ओळखून घटना बदलणाऱ्या त्यांची जागा दाखवा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय समारोपात जे.के.जोंधळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक शंकरराव वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार संजय कदम व विनोद वाघमारे यांनी केले.
तिसरा सत्रात सुनिता कीर्तने आणि धम्मा शिरसाट यांच्या गायनाच्या व सकाळी आठ पर्यंत चाललेल्या कार्यक्रमाने तमाम भीमसागर मंत्रमुग्ध झाला होता.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील सर्वच सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले.