मांडवी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 4700 रुपयाच्या मुद्देमाल जप्त.
मांडवी प्रतिनिधी
मांडवी पोलीस ठाणे अंतर्गत पिंपळगाव फाटा येथील पेट्रोल पंपाच्या मागे शेतामध्ये झन्ना मुन्ना या नावाचा जुगार घेत असताना सहा व्यक्तीं वर कारवाई करण्यात आली.
पिंपळगाव फाटा येथे दिनांक 13.1.2023 पेट्रोल पंपाच्या पाठीमागे तुकाराम गुरणुले यांच्या शेता लगत कोरड्या नाल्यावर आरोपी पत्त्यावर पैसे लावून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मांडवी पोलिसांनी त्याच्यावर धाड टाकून कारवाई केली यावेळी मुद्देमालासह आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी एकूण सहा व्यक्तीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायद्याप्रमाणे कलाम 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आरोपीचे नाव. पुढीलप्रमाणे— 1)श्री. उष्णना पी. आसन्न इंदुरी वय 40 वर्षे व्यवसाय पेंटर रा. भीमसरी ता. जि. आदिलाबाद 2) गुलाब रूपचंद लसनकार वय 50 वर्षे व्यवसाय शेतमजुरी रा. रामपूर ता. जिल्हा आदिलाबाद 3) मोहन निवृत्ती सूर्यवंशी वय 44 वर्ष व्यावसाय शेती राहणार खुशीत नगर ता.जि. आदीलाबाद.4) इंद्रसेन गंगाराम मडावी राहणार तलाईगुडा ता. किनवट जि.नांदेड वय 35 वर्ष व्यावसाय शेती ता. किनवट जि.नांदेड 5) सुनील कचरू मुनेश्वर वय 45 वर्षे व्यवसाय शेतमजुरी राहणार पिंपळगाव ता. किनवट जि.नांदेड. 5) किरण गोविंद नरवाडे वय 35 वर्ष व्यवसाय शेतमजुरी राहणार पिंपळगाव फाटा ता. किनवट जि. नांदेड या आरोपीवर गुन्हा दाखल करून नोटीस देण्यात आलेली आहे अशी मांडवी पोलीस ठाण्यातून माहिती मिळालेली आहे.
पिंपळगाव फाटा येथील कार्यवाही सदर मांडवी पोलिस ठाणे मा. स.पो.नि शिवरकर , पो.उ.प.नि पठाण, पोकॉ. श्याम चव्हाण, नितेश लेनगुळे, रवी कोडमवार, राजू डांगे आदींनी ही कारवाई केली.