शिवसेना नेते रविंद्र वायकर व संपर्क प्रमुख थोरात लोहा विधानसभा दौऱ्यावर..*शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे….परमेश्वर जाधव
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२७ डिसेंबर पासुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विधानसभा मतदार संघ निहाय बैठका घेण्यात येत असून
त्याच अनुषंगाने दिनांक 28 डिसेंबर रोजी लोहा / कंधार विधानसभा बैठकीसाठी शिवसेना नेते ,आमदार रवींद्र वायकर आणि शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे लोहा दौऱ्यावर येणार असून विकी गार्डन लोहा येथे सकाळी 10 वाजता बैठक कीचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना राज्य संघटक एकनाथ दादा पवार, माजी खासदार सुभाष वानखेडे,माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,माजी आमदार अनुसया खेडकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण,सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील,सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे,जिल्हाप्रमुख माधव पावडे,जिल्हाप्रमुख बबन बारसे,जिल्हा प्रमुख बंडू खेडकर,युवासेना मराठवाडा विभागीय सचिव महेश खेडकर हयांच्या सह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी कंधार तालुक्यातील शिवसेना तालुका पदाधिकारी,शहर पदाधिकारी,युवासेना पदाधिकारी ,महिला आघाडी, सर्कल प्रमुख, गण प्रमुख,शाखा प्रमुख,जेष्ठ शिवसैनिक व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी केले आहे.