किनवट शहर परिसरात उच्छाद माजवणाऱ्या मोकाट गाढवांचा कायम बंदोबस्त करणे व गाढव मोकाट सोडणाऱ्या मालकावर कारवाई करा-नागरिकांची मागणी
किनवट/प्रतिनिधी: किनवट शहर परिसरात उच्छाद माजवणाऱ्या मोकाट गाढवांचा कायम बंदोबस्त करणे व गाढव मोकाट सोडणाऱ्या मालकावर कारवाई करणे बाबत माननीय मुख्यअधिकारी/ प्रशासक/ तहसीलदार किनवट यांना एका निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका सचिव व समाजसेवक राजेश पाटील आपल्या भाचीला उबदार कपडे खरेदी करण्यासाठी भाचीला सोबत घेऊन किनवटच्या छत्रपती शिवाजी चौकात गेले असता दोन-चार गाढवे सुसाट वेगाने भाचीच्या दिशेने येत असताना माझ्या नजरेस पडले तेव्हा मी तात्काळ माझ्या भाचीला उचलून बाजूला केले अन्यथा वेगळाच अनर्थ घडला असता.
सदरील चौकात वयोवृद्ध, बालके, शालेय विद्यार्थी ये-जा करतात त्यांना गाढवाच्या भीतीने जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यांचा विचार करून मोकाट गाढवे व जनावरे यांचा बंदोबस्त करावा अशी विनंती माननीय मुख्याधिकारी/ प्रशासक /तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत पत्रकार साजिद बडगुजर यांचा ही गाढवामुळेच अपघात झाला होता. याविषयी तहसीलदार मॅडम काय निर्णय घेतात याकडे सर्व शहरवासीयाचे लक्ष लागून आहे.
या निवेदनावर राजेश पाटील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ता.सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे ता.कार्याध्यक्ष सय्यद नदीम पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड यांच्या स्वाक्षरी आहेत.