कार्तीक पोर्णीमा निमित्त पांडुरंग रुक्मीणी ची नगर प्रदक्षिणा संपन्न!
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२८.जिल्यातील धर्माबाद येथील श्री विठ्ठलेश्वर मंदीर मध्यें मागील एक महिण्या पासुन कार्तीक मासा निमीत्त दैनंदिन काकडा आरती चे आयोजन करण्यात आले!
कार्तीक पोर्णीमा निमित्त सोमवारी श्री विठ्ठलाची पालखी धर्माबाद शहरातुन काढण्यात आली!
यावेळी मुख्य रस्त्याने पालखीचे व्यापारी बांधवांनी
श्री विठ्ठलाचे पुजन केले. या नगर प्रदक्षिणा श्री विठ्ठल
आपल्या भक्तांच्या भेटी साठी येतात आशी भावीकांची श्रद्धा आहे!
या नगर प्रदक्षिणा निमित्त वारकरी संप्रदायीक भजन,फुगड्या,पावले खेळली जातात.पालखी मंदीरात आल्यानंतर दहीहंडी फोडुन काल्याचा प्रसाद
भक्तांना वितरीत करण्यात येते.
या नंतर पांडुरंग रुक्मीणी ची महाआरती करुण महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे.
दि 2 डिसेंबर रोजी काकडा आरती समाप्ती निमीत्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.