नगर पालिका धर्माबाद येथील सहा.अभियंता चतुरभुज
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6. जिल्यातील धर्माबाद नगर पालिका येथील प्रतिक राजेंद्र माळवदे,वय 29 वर्षे,व्यवसाय नौकरी,पद नगर रचना सहा.अभियंता,नगर पालीका कोंडलवाडी. अतिरिक्त कार्यभार धर्माबाद.वर्ग – 2 अराजपत्रीत यांनी
श्री.गणेश गंगाधर दुदुलवाड,वय 42 वर्षे, रा.धर्माबाद, जि.नांदेड.यांच्या कडून त्यांच्या आई च्या नावे असलेली 1 गुंठा जमीन तक्रार दाराच्या नावे करण्यासाठी 10000 रु मागणी असल्यामुळे
दि.07/02/2023 रोजी तक्रार दाखल केली होती.
त्यामुळे लाच मागणी पडताळणी
दि. 23/02/2023 रोजी करण्यात आली होती.
लाचेची मागणी रक्कम रु. 10,000/- मागणी केली होती पण तडजोड अंती रु. 7,000/देण्याचे ठरले असताना तक्रारदार यांच्या आईच्या नावे असलेला एक गुंठा प्लॉटची गुंठेवारी करण्यासाठी यातील खाजगी ईसमाने आलोसे साठी रू.10000/- लाचेची पंचासमक्ष मागणी करून आलोसे यांनी पंचासमक्ष रू 7000/- घेण्याची सहमती दर्शविली.यातील तक्रारदार हे दोन वेळा लाच देण्यासाठी आलोसे यांच्याकडे पंचासह गेले असता,मी काम पुर्ण झाल्याशिवाय पैसे घेत नाही असे म्हणून आलोसे यांनी लाच स्विकारली नाही.
आज दि. 06/04/2023 रोजी पंचासमक्ष आलोसे यांनी लाचेच्या रक्कमेतील फाईलसाठी लागणारी फि रूपये 2892/- ची वसूली लिपीक श्री.राजेश खटके यांच्याकडे जमा करण्यास पाठवून उर्वरित लाचेची रक्कम स्विकारली नाही पण आरोपी लोकसेवक व खाजगी ईसम यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन धर्माबाद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
डॉ.राजकुमार शिंदे
पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.यांच्या मार्गदर्शनात
पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेंद्र पाटील,पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
सापळा/तपास अधिकारी म्हणून
श्री.प्रकाश वांद्रे
पोलीस उप अधीक्षक
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
सापळा कारवाई पथक खालील प्रमाणे
पोलीस उप अधीक्षक श्री अशोक इप्पर,सपोउपनि गजेन्द्र मांजरमकर, सपोउपनि श्री संतोश शेटे, पोकॉ रितेश कुलथे,पोकॉ यशवंत दाबनवाड,पोना बालाजी मेकाले,चापोह गजानन राउत, चापोना प्रकाश मामुलवार,अँटी करप्शन ब्युरो,युनिट नांदेड
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9623999944
राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.मोबाईल क्रमांक – 7350197197
कार्यालय दुरध्वनी – 02262-253512
@ टोल फ्रि क्रं. 1064