सेवा ही संघटन या उपक्रमाचे अखंड 750 दिवस पूर्ण.. ऍड दिलीप ठाकूर
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.भाजप स्थापना दिवसानिमित्त व हनुमान जन्मोत्सव चे औचित्य साधून ” सेवा ही संघटन ” या उपक्रमाला सलग ७५० दिवस पूर्ण झाल्याप्रित्यर्थ भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी कोरोना भारतातून हद्दपार होईपर्यंत भाजपातर्फे अखंडीतपणे मास्क,सैनीटायझर,बिस्किट व पाण्याची बॉटल वाटप करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रेरणेने भाजपा महानगर नांदेड तर्फे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ही अखंडीत सेवा सुरू आहे.श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड येथे कोविड लस घेणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क,सैनीटायझर, बिस्किट व पाण्याची बॉटल देण्यात येते.
या उपक्रमाला आतापर्यंत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड,खा. चिखलीकर,तत्कालीन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर,संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या सह अनेकांनी भेट देऊन दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले.दिलीप ठाकूर यांच्यासोबत दररोज साहित्य वितरण करण्यासाठी अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा ,संतोष ओझा, राजेशसिंह ठाकुर हे परिश्रम घेत आहेत.
निरंतर चालणाऱ्या या सेवा कार्यामुळे भाजपा महानगर नांदेड हे महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर आहे. जो पर्यंत लसीकरण सुरू राहील तोपर्यंत हा उपक्रम भाजपा नांदेड महानगर च्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती अभियान प्रमुख दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
दिलीप ठाकूर यांच्यासोबत दररोज साहित्य वितरण करण्यासाठी विलास वाडेकर,कामाजी सरोदे,अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा,प्रभुदास वाडेकर , राजेशसिंह ठाकुर, प्रशांत पळसकर,सविता काबरा,सुरेश लोट,महेंद्र शिंदे,विजय वाडेकर, अमोल कुलथिया,सागर जोशी हे परिश्रम घेत आहेत.
निरंतर चालणाऱ्या या सेवा कार्यामुळे भाजपा महानगर नांदेड हे भारतात सर्वात आघाडीवर असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.