किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

रावसाहेब दानवे पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच भाजपा नेते डॉ. अशोक पाटील सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भेटून विविध रेल्वे मागण्यांचे दिले निवेदन

किनवट:(तालूका प्रतिनिधी)
रावसाहेब दानवे पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारता भाजपा नेते डॉ अशोक पाटील सूर्यवंशी यांनी दि. 10 जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून आपल्या भागातील विविध रेल्वे मागण्यांचे निवेदन दिले.

महाराष्ट्राचे व मराठवाड्याचे शेवटचे टोक, आदिवासी, नक्षलग्रस्त, सीमावर्ती भाग म्हणून किनवट तालुका परिचित आहे. या रेल्वे मार्गावर मुदखेड, भोकर, हदगाव, हिमायतनगर, किनवट हे पाच तालुके येत. पुढे हा रेल्वेमार्ग तेलंगानातुन विदर्भातील मांजरी, चंद्रपूर, नागपुर ब्रॉडगेज लाईनला मिळतो. या
भागाच्या विकास व्हावा हाच विचार करणरे डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी यांनी मराठवाड्याचे सुपुत्र रावसाहेब दानवे पाटील यांना रेल्वेमंत्री पदी पदभार स्वीकारल्यानंतर रेल्वेच्या विविध मागण्यांचा पाढा वाचला.
यामध्ये मुंबई – नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस, शिक्षणाची सोय व्हावी व गंभीर आजारांसाठी उपचार घेता यावा या हेतूने पनवेल- नांदेड- पनवेल तर नांदेड – बेंगलोर – नांदेड हंम्पी एक्सप्रेस या गाड्यांचा विस्तार आदिलाबाद पर्यंत करावा तसेच किनवट रेल्वे स्टेशनला तीर्थक्षेत्र स्टेशनचा दर्जा देण्यात यावा. या स्टेशनवर कोच क्रमांक दर्शक बोर्ड लावावे. मुदखेड ते आदिलाबाद या मार्गावर वरील सर्वात मोठे स्टेशन असल्याने या ठिकाणी यात्री प्रतीक्षालय तयार करावे. यासह विविध मागण्याचे निवेदन डॉ.अशोक पाटील सुर्यवंशी यांनी दिले असुन लवकर ह्या मागण्या मान्य होतील अशी आशा व्यक्त केली आहे. या वेळी रमन जायभाये उपस्थित होते.

165 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.