दुपारी ४ वाजे दरम्यान पडलेल्या पावसामुळे किनवट तालुक्यातील बेंदि व चिखली गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरुन पाणी जात असल्याने वाहतुक बंद पडली
किनवट ता प्र दि ०९ मागील अनेक दिवसापासुन किनवट ते नांदेड हि वाहतुक पावसामुळे अनेक वेळा बंद पडत आहे यास राष्ट्रीय महामार्गावरील निर्माणाधिन पुल वेळेमध्ये निर्माण न झाल्यामुळे नागरीकांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यात आज दुपारी किनवट तालुक्यातील चिखली, बेंदी या परिसरात मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे या परिसरातील पाण्याने मौजे बेंदी व चिखली या गावाजवळ असलेल्या निर्माणाधिन पुलाच्या शेजारी तयार केलेले तात्पुरते पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली होती तर परिसरातील शेतात व आजु बाजुच्या गावामध्ये मजुरी करिता गेलेले शेतकरी, मजुरदार महिला, प्रवासी महिलांना आपल्या गंतव्यावर पोहचण्या करिता कमरे पर्यंत वाहत्या पाण्यातुन मार्ग काढावा लागला.
किनवट तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अल्पशा पावसामुळे नागरीकांना तासनतास रस्त्यावर वाहतुक खोळंबवली जात असल्याने ताटकळत बसावे लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील कंत्राटदाराची शुन्य नियोजन जबाबदार आहे यामुळे नागरीकांना त्यांचा जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. आज दुपारी ४ वाजे दरम्यान पडलेल्या पावसामुळे किनवट तालुक्यातील बेंदि व चिखली गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरुन पाणी जात असल्याने वाहतुक बंद पडली होती तर नागरीकांना पायी चालत कमरे एवढ्या पाण्यात मार्गकाढावाला लागला यावेळी महिला व लहान मुलांना त्याठीकाणी उपस्थित राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महेश तंबाखुवाला, नितिन रणविर, राजु भंडारे यांनी मार्ग काढण्यास व अडकुण पडलेल्या नागरीकांना सहकार्य केले.