जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आ.भीमरावजी केराम यांना शिक्षकांचे साकडे.
किनवट/प्रतिनिधी:
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशत:अनुदानित व विनाअनुदानित शाळा किंवा तुकडीवर नियुक्त पण 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% शासन अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता किनवट तालुक्यातील शिक्षण संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी आ.भीमराव केराम यांची त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
2010 मध्ये शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता या शासन निर्णयाचा फटका राज्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असलेले पण, टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘जुनी पेन्शन योजना’ मिळावी याकरिता येथील शिक्षक बांधवांनी आपल्या मागण्या आमदार भीमराव केराम यांच्या समोर ठेवल्या आमदार साहेबांनी शिक्षकांच्या भावना समजून घेतल्या या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली . याकामी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन आ.केराम यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी तालुक्यातून चंद्रकांत नेम्मानिवार सर,श्री सतीश राऊत सर, लईक सर, सतीश चनमन्वार सर आदी उपस्थित होते.