आनंदाचा शिधा किट वाटपाचे अंगठे घेऊन नियमित धान्य वाटपास दुकान चालकांनी लावली कात्री..* जिल्यातील सीमावर्ती भागात स्वस्त धान्य वाटपात मोठा घोटाळा?
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.26.जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील प्रकार चौकशी करून दोषीं दुकानावर कार्यवाही करावी; दक्षता समिती सदस्य गंगाधर धडेकर यांनी मागणी केली.:गोरगरिब जनतेसाठी अतीशय महत्वाचे असलेले सण उत्सव सुखात जावे त्यांना दोन घास भरवून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा किट वाटपाचे सुयोग्य नियोजन केले पण यातही काहीं दुकान चालकांनी नामी शक्कल लढवत आनंदाचा शिधा वाटप किट दिल्यावर लाभार्थी धारकाचे मशीनवर अंगठे घेऊन नियमित चालू सप्टेंबर महिन्याचे धान्य वाटपास कात्री लावली असल्याचा प्रकार धर्माबाद तालुक्यात घडला असून किती लाभार्थ्यांचे धान्य वाटप न करता तसेच ठेवले व कोण कोनत्या दुकान चालकानी हा प्रकार केला याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी दक्षता समिती सदस्य गंगाधर धडेकर यांनी तहसीलदार यांच्या कडे निवेदनादवारे केली आहे.
प्रत्येक लाभार्थ्यांना नियमित धान्य सोबत आनंदाचा शिधा किट वाटपाचे नियम असताना प्रत्यक्षात काहीं राशन दुकान चालकांनी आनंदाचा शिधा वाटप किट देऊन पात्र लाभार्थी धारकाचा ई पॉस मशीन वर अंगठा नोंदवला पण सोबत नियमित चालू सप्टेंबर महिन्याचे धान्य वाटप केले नाही.
असा प्रकार किती दुकानात घडला व किती लाभार्थीच्या धान्य वाटप करण्यात आले नाही याची चौकशी होणे गरजेचे बनले आहे.
शहरातील धान्य वाटप प्रक्रिया पारदर्शक राहावी,प्रत्येक लाभार्थी कुटुंबास हककाचे राशन मिळावे व लाभार्थी कुटुंबांची कोणतीही हेळसांड होऊ नये गैर कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दक्षता समिती नियुक्त केली पण दर महा वितरीत होणारे धान्य व त्यांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची बैठकच होत नसल्याने समिती सदस्य देखील प्रशासनाच्या कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
आनंदाच्या शिधा किट सोबत नियमित धान्य वेळेवर वाटप व्हावे म्हणून २सप्टेंबर रोजी अनेकांची धान्याचे नियतन उचलले पण वाटपाच्या कार्यात खोडा घालून ब्रेक लावला त्यामुळें याचा फटका किती लाभधारकाणा बसला व कोणत्या दुकान चालकांनी हा प्रकार केला याची सखोल चौकशी होणे गरजेचे बनले आहे.
गोरगरिब जनतेसाठी सरकार धान्य पुरवीत असते ते धान्य शासकीय गोदामातून प्रत्येक महीन्यात उचलले जाते पण लाभार्थी नागरिकांना वेळेवर का वाटप केले जात नाही असा सवाल उपस्थित करून ज्या दुकान चालकांनी चालू सप्टेंबर महिन्याचे नियमित धान्य अद्यापही वाटप केले त्यांची चौकशी करून कर्यवाही करन्यात यावी अशी मागणी तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे दक्षता समिती सदस्य गंगाधर धडेकर यांनी सांगितले आहे.
ज्या दुकान चालकांनी हा प्रकार केला त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी पुरवठा मंत्रालयाकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे