कंत्राटी भरतीस विरोध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्निल इंगळे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे नोंदविली मागणी…
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२७.कंत्राटी पद्धतीने भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे आपली मागणी नोंदविताना सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत निवेदवानाद्वारे कडक इशारा देण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरकारी भरतीमध्ये गैरप्रकार होत आहेत.परीक्षा शुल्कच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडत आहे.
शिक्षणाचे खासगीकरण,स्पर्धा परीक्षा,नोकर भरती,पेपर फुटी अशा घोटाळ्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यात येत आहे,असा आरोप राष्ट्रवादी काँग्रसचे युवा कार्यकर्ते स्वप्निल इंगळे पाटील यांनी केला.कंत्राटी भरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे.
ठेकेदारांच्या फायद्यासाठी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यात येत आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात आले.मात्र पेपर फोडण्यात आले. त्यामुळे तलाठी भरतीचे शुल्क परत मिळाले पाहिजे.राजस्थान सरकारसारखा कायदा राज्य सरकारने केला पाहिजे आणि परीक्षा घोटाळ्यासंदर्भात समितीकडून चौकशी झाली पाहिजे,अशा मागण्या निवेदवानाद्वारे यांनी केले आहेत