जिप पालईगुडा शाळेतील पाच विद्यार्थी नवोदय पात्र; सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी शिक्षक,विद्यार्थ्यांचा केला सत्कार;
किनवट(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्ग समजल्या जाणाऱ्या माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालईगुडा शाळेतील दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यशस्वीतेचा आलेख कायम ठेवत पालईगुडा जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थी शंकर नगर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालईगुडा शाळेतील उपक्रमशील कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर मार्गदर्शक शिक्षक
सुरेंद्र कुडे यांच्या अथक प्रयत्नातून मुख्याध्यापक पिसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे.
या शाळेचे वैशिष्टे म्हणजे नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी नवोदय साठी पात्र होत असतात त्याचबरोबर नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे मराठवाड्यातून इस्रो आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राला भेट देण्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा सदर शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली होती.
या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक अभिनंदन करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किनवट तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी नवोदय पात्र विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना बोलवून त्यांचे अभिनंदन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले.
यावेळी नवोदय पात्र पाच विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक सुरेंद्र कुडे, मुख्याध्यापक पिसलवार आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी शंकर साबरे,त्यांचबरोबर जाधव,धपके,मिसे राठोड, सावरगावे,मेश्राम,जिप पालईगुडा शाळेतील पाच विद्यार्थी नवोदय पात्र;
सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी शिक्षक,विद्यार्थ्यांचा केला सत्कार;
किनवट(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्ग समजल्या जाणाऱ्या माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालईगुडा शाळेतील दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यशस्वीतेचा आलेख कायम ठेवत पालईगुडा जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थी शंकर नगर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालईगुडा शाळेतील उपक्रमशील कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर मार्गदर्शक शिक्षक
सुरेंद्र कुडे यांच्या अथक प्रयत्नातून मुख्याध्यापक पिसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे.
या शाळेचे वैशिष्टे म्हणजे नवोदय विद्यालयात प्रवेशसाठी दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी नवोदय साठी पात्र होत असतात त्याचबरोबर नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे मराठवाड्यातून इस्रो आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राला भेट देण्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा सदर शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली होती.
या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक अभिनंदन करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किनवट तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी नवोदय पात्र विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना बोलवून त्यांचे अभिनंदन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले.
यावेळी नवोदय पात्र पाच विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक सुरेंद्र कुडे, मुख्याध्यापक पिसलवार आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी शंकर साबरे,त्यांचबरोबर जाधव,धपके,मिसे राठोड, सावरगावे,मेश्राम,गुद्देटवार,कुसुमवाड,वाघमारे,आदी तालुक्यातील शिक्षक वर्ग उपस्थित होते.