प्राथमिक शिक्षक महेंद्र एडके सेट परीक्षा उत्तीर्ण
किनवट (प्रतिनिधी)
किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तांडा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेली महेंद्र एडके यांनी नुकत्याच मार्च 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता सेट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग यश संपादन केले आहे. मुळगाव बोधडी बु; असलेले महेंद्र एडके यांनी बारावी डीएड करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडखेडी केंद्र थारा ता किनवट इथून आपल्या प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात केली. त्यानंतर ते सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तांडा केंद्र जलधरा येथे कार्यरत आहेत.आपल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये वाढ करावी त्याचबरोबर अद्यावत शिक्षणाच्या प्रवाहात राहावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून बीए पदवी , मराठी आणि इतिहास या दोन विषयांमध्ये एमए पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर सध्या ते इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामध्ये बिएड शेवटच्या वर्षांमध्ये प्रवेश आहे, त्याचबरोबर सेवा अंतर्गत बीएससी शिक्षण सुद्धा चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे प्राथमिक शिक्षकांमधून केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी उपशिक्षणाधिकारी अशी पदभरती केली जाणार असल्यामुळे महेंद्र माधवराव एडके यांनी आपल्या ज्ञानामध्ये अविरत व सातत्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे भर दिलेला आहे. याचीच एक यशस्वी वाटचाल म्हणजे महाविद्यालयीन शिक्षकासाठी अत्यंत आवश्यक असणारी SET/NET ही परीक्षा महेंद्र एडके यांनी प्राचार्य मोतेराव सर व प्राध्यापक प्रदीप एडके विस्तार अधिकारी संजय कराड
यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यामुळे सर्व साईनगर गोकुंदा यांच्या वतीने शाल फेटा पुष्पहार देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षक मेघराज राठोड,पांडुरंग खरोडे,मारोती भोसले,कपिल कावळे,अनमोल गायकवाड,घनश्याम कोवे,दत्ता कोवे,अनिल राठोड,अर्जुन गवले,वगावाड सर,सुनील जाधव तसेच माजी सैनिक इंदल जाधव,एलआयसी अधिकारी शत्रूघ्न सिडाम विमाप्रतिनिधी नारायण चंदनकर आदी साईनगर मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.