किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

गाव पातळीवर काँग्रेस संघटन मजबूत करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड दि. १९ कर्नाटक काँग्रेस विजयानंतर आता देशभर काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे विशेषतः पक्षातील युवा कार्यकर्त्यानी गाव पातळीवर काँग्रेस संघटन आणखी मजबूत करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
शहराच्या नवा मोंढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात सोमवार दि. १९ जुन् रोजी एनएसयूआयच्या काही पदाधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते व्यासपीठावर काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगांवकर ,प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत ,आ. मोहन हंबर्डे , एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख , प्रदेश सचिव ऍड.सुरेंद्र घोडजकर , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, माजी उपमहापौर शमीम अब्दुला , तालुकाध्यक्ष शरद पवार, बालाजी पांडागगळे , एन एस यु आय चे जिल्हा अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर,इजिं.हरजिंदर सिंघ संधू शहरजिल्हाध्यक्ष सो.मी.काँग्रेस नांदेड आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की,काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या माध्यमातून देशाला युवा नेतृत्व लाभले आहे त्यांचाच वाढदिवसाचे औचित्य साधत एनएसयूआयच्या काही पदाधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले आहे . कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरू झाल्याची नांदी असून कर्नाटक विजयाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था ,लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. धार्मिक मुद्दे आणत व्होट बँकचे राजकारण तसेच धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न होईल यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दक्ष असावे काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष विचार घरा-घरात पोहचवा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगांवकर म्हणाले की देशात ३० टक्के युवकांची संख्या पाहता आपला देश युवकांचा आहे. युवकांनी आता सजग झाले पाहिजे भारतीय जनता पक्ष विकास ,रोजगार यापेक्षा प्रचारातून भावनिक मुद्दे उपस्थित करीत लोकांचे लक्ष्य अन्यत्र वळवण्याचे काम करीत आहे याबाबत आपण सतर्क होऊन भाजप सरकारचे अपयश लोकांपर्यत मांडत आपल्या पक्षाचा विचार गाव,वाडी व तांड्यापर्यत पोहचवा या सरकारवर सर्वसामान्य जनता ,शेतकरी नाराज आहेत यामुळे आगामी काळात सत्ता परिवर्तन होणार आहे यासाठी आता पासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षिरसागर ,सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती
भारत जोडो यात्रेचा कर्नाटकात इफेक्ट -माजी मंत्री डी.पी. सावंत
कन्याकुमारी ते काश्मीर या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे या यात्रेचा फायदा कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला झाला आहे. हाच काँग्रेस विजयाचा ट्रेंड अन्य ठिकाणीही दिसून येईल भाजपा सरकारने विरोधी पक्षाला विश्वासात न घेता अनेक कायदे संमत करून घेत आहे. हे लोकशाहीला धरून नाही हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीच्या बळकटीकरणा साठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षसंघटन वाढीसाठी युवकांनी पुढे यावे -माजी आ. अमरनाथ राजूरकर
काळात स्थानिक स्वराज्य संस्था ,लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत या दृष्टिकोनातून कामाला लागा असे म्हणत काँग्रेस पक्षसंघटन वाढीसाठी युवकांनी पुढे यावे असे प्रतिपादन माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.

134 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.